वाहन सोडल्याचा आरोप, चौकशीचे आदेश :उपविभागीय अधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश; तक्रारीनंतर कारवाईची मागणी तीव्र

वाहन सोडल्याचा आरोप, चौकशीचे आदेश :उपविभागीय अधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश; तक्रारीनंतर कारवाईची मागणी तीव्र

नेवासा तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरण तापले; जप्त वाहन सोडल्याचा आरोप, चौकशीचे आदेश :उपविभागीय अधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश; तक्रारीनंतर कारवाईची मागणी तीव्र

चांदा वार्ताहर

नेवासा तालुक्यातील चांदा भागातील अवैध उत्खननाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून सोनई पोलीस ठाण्यात, जप्त केलेले वाहने ही कुणाच्या आदेशाने पोलिसांकडून सोडण्यात आल्याचा आरोप समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात गट क्रमांक 746 मध्ये 4 मार्च 2026 रोजी अवैध उत्खनन सुरू असताना कारवाई करण्यात आली होती. यावेळी जेसीबीसह (क्र. MH 17 CE 4247) एक ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यत आली होती. ही कारवाई महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने केली होती.मात्र, याबाबत अहिल्यानगर प्रांत अधिकारी तक्रार करण्यात आल्यानंतर यांनी वरील आदेश दिले या प्रकरणात असा आरोप करण्यात आला आहे की, जप्त करण्यात आलेले वाहने पोलिसांनी परस्पर सोडून दिले. यामुळे कारवाईची विश्वासार्हता आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून स्पष्ट निर्देश दिले आहेत की,

जप्त वाहन कोणत्या परिस्थितीत सोडण्यात आले?

त्यासाठी कोणती अधिकृत प्रक्रिया पार पडली का?

संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी

तसेच, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.:

अहिल्यानगर परिसरात अवैध उत्खननाचे प्रकार नव्याने उघड होत नाहीत, मात्र या प्रकरणात जप्त वाहन सोडल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतरही जर नियमभंग होत असेल, तर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव किंवा दबावाचे राजकारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेमुळे पुढील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत :

अवैध उत्खनन रोखण्यासाठी असलेली यंत्रणा कितपत प्रभावी आहे?जप्त केलेल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत ठोस नियमांची अंमलबजावणी होते का?

संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का?

स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे नाराजी वाढत असून, पारदर्शक आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने या प्रकरणात ठोस भूमिका घेतली नाही, तर अवैध उत्खननाला आणखी खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चौकट. नेवासा तालुक्यातील चांदा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जमिनीमध्ये अवैद्य उल्कनन होत असताना या प्रकरणांमध्ये नेवासा तहसीलदार यांची भूमिका संशयास्पद वाटत असून व वाहने सोडण्यासाठी आपल्या ड्रायव्हरला सोनई पोलीस ठाण्याला फोन करून संबंधित वाहने सोडण्याची सांगितले मात्र लेखी आदेश दिला नाही तोंडी बोलीवर वाहने कशी सोडली हा घोडेगाव चा बाजार वाटतो का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे एकूणच या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. चौकट जप्त केलेली वाहने सोडण्याचा कुठलाही लेखी आदेश नसताना सोनई पोलिसांकडून तोंडी बोलीवर वाहने कशी सोडली याची चौकशी होणे गरजेचे आहे तहसीलदार यांचे वाहनचालक पोलिसांना फोन करून व आणि सोडायचे सांगतात त्याचे अंमलबजावणी पोलिसांकडून केली जाते त्यामुळे नेवासा तालुक्यात महसूल प्रशासनाचा नेमका काय प्रकार चालू आहे हे कळायला मार्ग नाही