सोनई -खेडले परमानंद रोडवर जाधव वस्ती येथे बाभळीचे झाड रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत.
खेडले परमानंद //प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद सोनई रोडवर जाधव वस्ती या ठिकाणी मुख्य रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्यामुळे दिनांक 30 मार्च सोमवार पासून वाहतूक विस्कळीत झालेली आहे आज 31 मार्च दुपार उलटली तरी अद्यापही या झाडाचा अडथळा दूर करण्यात आला नाही त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे .
त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे तरी संबंधित बाबीची नोंद घेऊन प्रशासनाने हा अडथळा त्वरित दूर करावा अशी परिसरातील नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे .
या रस्त्याने आरोग्य शिक्षण व व्यावसायिक दृष्टीने मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरू असते परंतु कालपासून सदरची वाहतूक अक्षरशः बंद पडली आहे व या ठिकाणी अपघाताचाही धोका वाढला आहे.








