स्वयंचलित यंत्रे व ए आय असिस्टेड यंत्रांमुळे श्रम कमी होऊन उत्पादन वाढेल - कुलगुरु - डॉ. विलास खर्चे .

स्वयंचलित यंत्रे व ए आय असिस्टेड यंत्रांमुळे श्रम कमी होऊन उत्पादन वाढेल - कुलगुरु - डॉ. विलास खर्चे .

*स्वयंचलित यंत्रे व ए आय असिस्टेड यंत्रांमुळे श्रम कमी होऊन उत्पादन वाढेल* *- कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

           शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता स्वयंचलित व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रांची निर्मिती करणे गरजेचे आहे. कृषि विद्यापीठ व खाजगी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने काही यंत्रांमध्ये संयुक्तपणे संशोधन करून शेतकरीभिमुख स्वयंचलित व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रे हे शेतकर्यांसाठी श्रम कमी करणारे व शेतीचे उत्पादन वाढणारे असेल असे प्रतिपादन सामंजस्य कराराच्या वेळेस कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

            महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अ.शिं.कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाअंतर्गत भा.कृ.अ.प- अ.भा.स. कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प आणि मेसर्स साई सिद्धी एंटरप्रायझेस, एमआयडीसी,अहिल्यानगर व मेसर्स नियो फार्मटेक प्रा. लि., वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर यांच्यात ’ट्रॅक्टर-चलित मका काढणी यंत्र आणि सायलेज पॅकेजिंग’ आणि ’द्राक्षांच्या छाटणीनंतर प्रमुख रोगांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी ए आय-असिस्टेड स्प्रेअरचे स्वयंचलीकरण’ या दोन यंत्राच्या सहयोगात्मक संशोधन आणि विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. प्रशांत बोडके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे तर कंपनीच्या वतीने मेसर्स साई सिद्धी एंटरप्रायझेसच्या श्रीमती. छाया शिंगटे तर मेसर्स नियो फार्मटेकचे इंजि. योगेश गावंडे यांनी केल्या.

            कार्यक्रमास महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अ.भा.स कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड व या प्रकल्पाचे शास्त्रज्ञ प्रा. महेश पाचारणे, डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड आणि एमआयडीसी अहिल्यानगरचे श्री. बाबासाहेब शिंदे व एमआयडीसी छत्रपती संभाजीनगरचे अभियंता योगेश गावंडे उपस्थित होते. या उपक्रमामुळे कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शेतकर्यांना अधिक कार्यक्षम, वेळ वाचवणारी आणि उत्पादनवाढ साधणारी कृषि यंत्रे उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.