शेवगाव येथील अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .
*शेवगाव येथील अवैध वाळु वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*आरोपीसह 5,20,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त*
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. त्यानुषंगाने संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, सुनिल पवार, विशाल तनपुरे व भगवान सानप अशांचे पथक तयार करून अवैध वाळु वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 08/10/2026 रोजी पथक शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की, ढोरजळगाव गावचे शिवारात भातकुडगाव येथून ढोरजळगावकडे एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून वाळुची वाहतुक करत आहे.मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी पथक पंचासमक्ष सापळा रचुन थांबले असता एक लाल रंगाचा ट्रॅक्टर मिळून आल्याने त्यास थांबवून पाहणी केली असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू मिळून आल्याने 1) बाबु अकबर बेग, वय 31, रा.ढोरजळगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वाळु वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांचेकडे वाळु वाहतुकीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीचे कब्जातून 5,00,000/- रू किं.त्यात महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली व 20,000/- रू किंमतीची वाळु असा एकुण 5,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.वर नमूद आरोपीविरूध्द शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 790/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील कारवाई ही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.








