नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा*
*नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा*. बी .पी .एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क. नागपूर:-( सभापतीपदी सुषमा कावळे तर उपसभापतीपदी उमेश राजपूत यांची वर्णी) हिंगणा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुषमा कावळे सभापतीपदी तर उपसभापतीपदी उमेश राजपूत यांची वर्णी लागली. नागपूर जिल्ह्यातील 14 सदस्य असलेली सर्वात मोठी हिंगणा पंचायत समिती असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री रमेशचंद्र बंग व माजी आमदार विजय घोडमारे (पाटील ) यांच्या नेतृत्वात सत्ता कायम राखली. विशेष म्हणजे मागील वीस वर्षापासून या पंचायत समितीवर माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांच्या नेतृत्वात विजय रॅली काढून ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंद साजरा केला. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. तर बंग यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गटनेते दिनेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, खरेदी-विक्री संघाचे सभापती श्याम बाबू गोमासे, प.स सदस्य सुनील बोंदाडे, राजेंद्र उइके, आकाश रंगारी, अनुसया सोनवणे, पोर्णिमा दीक्षित , वैशाली काचोरे, रुपाली खाडे, राजेंद्र गोतमारे, रामकृष्ण महल्ले, प्रेमलाल चौधरी, हिंगणा नगरपंचायत चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते गुणवंता चामाटे, नगरसेवक प्रवीण घोडे, सुशील दीक्षित , मिलिंद काचोरे, विजय कचोरे,, प्रमोद बंग, भैय्यालाल ठाकूर, गोकुल मिनियार, हनुमंत दुधबळे, रामू दाभेकर, अतुल कडू, संतोष गव्हाळे, नाना शिंगारे, मुकेश पाल, योगेश कोठेकर, संजय नवघरे, अविनाश गोतमारे, शैलेश रॉय, दामोधर सोनवाणे, निखिल उमरेडकर, नारायण ढोले, सुरेश उमरेडकर, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.