*राज्याचे मा. मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांचे मास्क वापरण्याचे आवाहन.*

*राज्याचे  मा.  मुख्यमंत्री  ठाकरे  साहेब  यांचे  मास्क  वापरण्याचे  आवाहन.*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी.(ता. बार्शी)          मुंबईसह पुण्यात कोरोना च्या संख्येमध्ये

वाढ होत असलेल्या कारणाने नागरिकांना खबरदारीचे आवाहन.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी सर्व जनतेला

आवाहन केले आहे की कोरोना जरी कमी झाला असला तरी त्याचे

कमी प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जनतेस मास्क वापरण्याचे

आवाहन केले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालच्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना बाबतच्या विषयावर चर्चा करून

आढावा घेण्यात आला. या चर्चेमध्ये मुंबई सहित पुणे इतर

ठिकाणी कमी प्रमाणात का होईना कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत

असल्याचे दिसून येत आहे. 1 ते 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत

आणि 20 ते 22 जण कोरोना वर उपचार घेत आहेत. तरी

नागरिकांनी याची वेळेवर खबरदारी घेण्याची गरज आहे. तरी

सर्वांनी मास्क वापरावे असे राज्यातील जनतेला  ठाकरे सरकार

यांनी आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे राज्यात कमी झालेल्या

चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिले आहेत.

याची नव्याने उभारणी करण्याची गरज आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.