*बार्शी तालुक्यातील प्रकार: पेट्रोल पंप देतो म्हणून 14 लाखाची जबर फसवणूक*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी- एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल पंप टाकून देतो म्हणून 14 लाखाची फसवणूक केल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला. त्या अज्ञात व्यक्तीने इंडियन ऑइल पेट्रोलियम चा पेट्रोल पंप देतो असा प्रकार बार्शी तालुक्यातील कुसळंब या गावामध्ये घडला.
योगेश विजय पाटील (वय 25 राहणार कुसळंब ता. बार्शी). यांच्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी योगेश यांनी 12 मे 2021 रोजी इंटरनेटवरून इंडियन ऑइल पेट्रोलियम बाबत माहिती घेत असताना त्यांना कॉल आला व पेट्रोल पंप टाकण्याबद्दल बोलण्यात आले व फिर्यादी यांना मोबाईल व्हाट्सअप वर संपूर्ण माहिती टाकली असता फिर्यादी योगेश यांनी सर्व आवश्यक कागदपत्र त्या अज्ञात व्यक्तीला दिले असता त्या व्यक्तीने तीस हजार पाचशे रुपये मागितले असता फिर्यादी योगेश यांनी 30000 पाचशे रुपये त्यांना पाठवले व परत एक लाख 65 हजार 500 रुपये डीलरशिप साठी मागितले असता तीही रक्कम फिर्यादी योगेश यांनी त्यांना पाठवली. त्यानंतर डीलरशिप सर्टिफिकेट पण फिर्यादीस पाठवून दिली. त्यानंतर लायसन्स साठी लागणारे लायसन फी चार लाख 25 हजार दोनशे रुपये हे मागितले त्यावेळी फिर्यादी यांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे रक्कम ही टप्प्याटप्प्याने पाठवत गेले. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन लायसन पण पाठवून दिले त्यानंतर पुन्हा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 7 लाख 74 हजार पाचशे रुपये फिर्यादीस मागण्यात आले त्यानंतर ही रक्कम पण टप्प्याटप्प्याने पाठवण्यात आली त्यानंतर जमा केलेले रकमेचे पण सर्टिफिकेट पाठवून दिले. असे फिर्यादी योगेश यांनी 13 लाख 95 हजार 700 रुपये जमा केले होते.
सदर या घटनेबाबत फिर्यादी स काही संशयालयाने त्यांनी इंडियन ऑइल सोलापूर येथे जाऊन चौकशी केली त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी आम्ही अशी ऑनलाईन पेमेंट पण घेत नाही व त्याचे ऑनलाइन पद्धतीचे लायसन पण आम्ही देत नाही असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी याने ताबडतोब बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन त्या अज्ञात इसमावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.