मूल होत नाही म्हणून पत्नीचा खून; कात्रज भागातील घटना- पती अटकेत.
बी पी एस राष्ट्रीय न्युज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
पुणे- मानव जातीला काळीमा फासणारी घटना कात्रज भागात घडली.मूल होत नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या असा प्रकार आढळून आला.
याप्रकरणी भारती विद्यापीठातील पोलीस यांनी पतीला अटक केली. या प्रकरणी देवानंद मीच्छेद काळेल (वय 30 राहणार वेताळ नगर आंबेगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली. काजल देवानंद काळेल (वय 24 )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे काजल चे वडील मारुती वाड (राहणार कोनगाव जिल्हा ठाणे) यांनी यासंदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवानंद हा मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवासी आहे. त्याचा दोन वर्षापूर्वी काजल बरोबर लग्न झाले होते परंतु मुल होत नसल्या कारणाने तो तिचा छळ करायचा. दोन दिवसापूर्वी या दोघांचे भांडण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली व देवानंद ला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.