*जागतिक "आरोग्य दिन"*
बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर.
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. आजदि.07 मार्च जागतिक आरोग्य दिन. आपला भारत देश हा योग आणि अध्यात्माशी जोडलेला आहे हे भारताची संपूर्ण जगभरात जोडलेली ओळख आहे. अध्यात्मातून मनामध्ये असलेले विकृत विचार दूर होऊ शकतात.
आरोग्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक रित्या तंदुरुस्त होणे खूप गरजेचे आहे. जर एखादी व्यक्ती शारीरिक रीत्या व मानसिक रित्या फिट असेल तर त्याला तंदुरुस्त असे म्हणतात. निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य जगू शकते असे म्हंटले आहे. लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणा विषयी जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
आयुष्यात प्रत्येक वेगळी व्यक्ती, त्याचे वेगळे गुण असतात मात्र सततची हेटाळणी आणि दुर्लक्ष याला समाज दुर्लक्ष आहे. आदराने एकमेकांना साथ दिली तर माणसं नैराश्यातून मुक्त होतात व जाणारे बळी कमी होतात. वैद्यकीय उपचार करता येतील पण मानसिक रित्या मूळ पदावर आणणे व व्यक्तीला जगण्याचा मार्ग दाखवणे हीच समाजाची जबाबदारी आहे. एकंदरीत जर पाहिलं तर जगामध्ये शरीरसृष्टीमध्ये भारत हा अग्रेसर आहे. भारतातील जनता बाकी पेक्षा आरोग्याला, शरीराला जास्त महत्त्व देते.
आणि ह्याला कारणीभूत असलेले आपल्या भारत देशातील मंदिरे हे एक मानसिक रित्या समाधानाचे प्रतीक आहेत माणूस डिप्रेशनने कमी होतो त्याला एक आधाराची गरज असते ती म्हणजे आपल्या देशातील प्राचीन मंदिरे, पर्यटन स्थळे, नातेवाईक, मित्रमंडळी. एकाकी राहणे, चिडचिड करणे, मनामध्ये द्वेष धरणे, एखाद्याबद्दल वाईट विचार करणे, अबोल रहाणे, चिंताग्रस्त रहाणे असे विचार माणसाच्या शरीराचे खच्चीकरण करतात. जेवढा माणूस आनंदी राहील हसून खेळून राहील तेवढा तंदुरुस्त राहतो.
आत्ताच्या कोरोना महामारी काळात माणसाचे खूप मोठे नुकसान झाले काही माणसे चिंता- टेन्शन घेऊन मरण पावले तर काही माणसांनी टेन्शन न घेता त्याच्यावर जास्त विचार न करता आपली जागृकता पाहून राहिल्यामुळे माणसाचे खच्चीकरण कमी झाले. त्यामुळे एखाद्या वाईट गोष्टी कडे जास्त लक्ष घातल्यास माणसाच्या शरीराला धोका होऊ शकतो. सर्व देश मिळून साधारणतः 700 कोटी पर्यंत लोकसंख्या आहे यातील 30 कोटी लोक चिंताग्रस्त आहेत. तशी मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी ही बाब असली तरी यावर उपाय करणे शक्य आहे नैराश्यातून जाणारा माणूस आत्महत्येच्या वाटेवर असतो जेवढं होता होईल तेवढं माणसाने सदृढ रहावे. निरंतर योग, व्यायाम करावा, शुद्ध व ताजे खावे. शरीर हेच धनसंपदा आहे शरीराचे मोल नाही, त्याची किंमत करता येत नाही त्यामुळे पैशापेक्षा जास्त शरीराला महत्व द्यावे. सर्वांनी शरीरावर जास्त लक्ष द्यावे व याकरिता 07 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन संबोधल्या जातो.
सर्वांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.