*उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील "गड किल्ल्याची" स्वच्छता मोहीम.*
बिपिएस राष्ट्रीय लाईव्ह न्युज, उस्मानाबाद
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
परंडा- दि.03- एप्रिल 2022
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 342 व्या पुण्यतिथी निमित्त शिवरायांचा विचार घेऊन हिंदुस्तानचा अभिमान आणि आणि मावळ्यांनी रक्ताचे थेंब थेंब सांडुन जपलेला स्वाभिमान म्हणजेच आपले गड किल्ले.
आपल्या महाराष्ट्राचे वैभव गड किल्ले, किल्ले परंडा स्वच्छता मोहीम क्रमांक 5. सह्याद्री प्रतिष्ठान व बार्शी सोलापूर जिल्हा. दिनांक 3 एप्रिल रोजी परंडा गड किल्ला स्वच्छता मोहीम- किल्ल्यातील भुईवरती बुरुज तसेच पर्यटकांना फिरण्यासाठी पाऊलवाटा, अनावश्यक काटेरी गवत काढून स्वच्छता मोहीम केली.
बरेच वर्षांपासून या किल्ल्यामध्ये कोणी लक्ष न दिल्यामुळे येथील झाडेझुडपे, काटे कचरा भरपूर प्रमाणामध्ये साचलेला होता. आत मध्ये जाण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने व शिवप्रेमींच्या वतीने हे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शिवभक्त मुलींनी सुद्धा शिवरायांचे आचरण घेऊन स्वच्छता मोहीम करण्यास सज्ज होते.
गड किल्ले हे आपले वैभव आहे, हे आपले वैभव आपण जपली पाहिजे. हे गड किल्ले म्हणजे आपल्याला छत्रपतिंची प्रेरणा देणारे शौर्य आहे. या परंडा गड किल्ले असे सांगण्यात येते की छत्रपतींचे मातोश्री जिजाबाई व शहाजी राजे या ठिकाणी वास्तव्य करून गेले आहे.
तसेच हे पूर्ण गड-किल्ला स्वच्छता करण्याचा वसा सह्याद्री प्रतिष्ठान व शिवप्रेमींनी घेतला आहे. छत्रपतींच्या पुण्यतिथी निमित्त किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे हार पुष्पगुच्छ घालून आरती पूजन करण्यात आले. त्याच दिवशी गड किल्ले मध्ये बाहेरून पुणे व इतर ठिकाणाहून किल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक आले होते. त्यांना पण खूप चांगले वाटले की कुठेतरी शिवरायांचा वसा हाती घेतलेले अजून शिवप्रेमी आहेत त्यांनी पण शिवप्रेमीं चे अभिनंदन केले.
यावेळेस सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक आणि पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका विभाग प्रमुख, बार्शी तालुका संपर्क प्रमुख यांनी पण परंडा गड किल्ला येथे येऊन स्वच्छता मोहीम राबवली.