बार्शी शहर येथे पोलीस जाणीव सेवा संघ व मराठा महिला सेवा संघ आयोजित "जागतिक महिला दिन" निमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज.
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी (ता.बार्शी). दि.08/03/2022 रोजी सुभाष नगर रोटरी क्लब येथे महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबवून कार्यक्रम घेण्यात आले.
अतिशय सुंदर आशा नेतृत्वाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम राष्ट्रमाता आई जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय वैद्यकीय अधिकारी सौ. शीतल बोपालकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित माननीय डमरे मॅडम हेे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळकर मॅडम यांनी केले.
तसेच सन्माननीय तृतीयपंथी वर्ग- किरणजी, लताजी, आरतीजी, चांदणीजी, लावण्याजी. तसेच पोलीस महिला कर्मचारी- माननीय शारदा पारधी, शुभांगी गाडे वैद्यकीय कर्मचारी- स्वप्नाली उकिरडे, मनिषा गीते. सफाई कर्मचारी- माननीय सुनिता कांबळे, अमिता साठे. या सर्वांचा covid-19 योद्धा प्रमाणपत्र व गिफ्ट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.या सर्व कार्यकारी महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
निंबाळकर मॅडम यांनी अतिशय सुंदर शब्दात सांगितले की काही अशिक्षित समाजातील लोकांमध्ये गैरसमज असतात तृतीयपंथी वर्गांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही असे न होता आदर केला पाहिजेे.कारण ते पण या समाजाचे घटक आहेत आपण त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना चांगली वागणूक, सन्मान दिला पाहिजे.
यावेळी रूपाली विधाते मॅडम यांनी पण दोन शब्द म्हंटले की तृतीयपंथी हे पण आपल्या सारखेच आहे यांना पण आशा असतात यांना पण वाटतं की जे समाजामध्ये आपण वावरावे. आपण कसल्याही प्रकारचे भेदभाव न करता त्यांचा आदर केला पाहिजे असे सुंदर व्यक्तव्य केले.
तसेच महिला पोलीस वर्ग यांची ड्युटी 24 तास म्हणायला काही हरकत नाही कारण जनतेच्या रक्षणासाठी ते आपल्या वेळेचा विचार न करता ड्युटी बजावत असतात. घरात जरी तान्हे बाळ असले तरी देश सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे असे मानत समाजाचा विचार करत कार्य करत असतात.
तसेच वैद्यकीय कर्मचारी ही कुठल्याही प्रकारचे जात- पात धर्म -भेद हे बाजूला ठेवून कार्य करत असतात.
सफाई कामगार यांचा पण समाजाला खूप मोठा वाटा आहे कचरा करणं आपल्याला सोपं जातं पण कचरा करणारे आपण आणि उचलणारे सफाई कामगार खरे तर आपण असा विचार केला पाहिजे की कुठल्या ठिकाणी कचरा न फेकता व्यवस्थित रित्या एकाच जागी जमा करून ठेवावा. खरी देश सेवा करणारे हेच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.
या सर्व कर्मचारी वृन्दान्ना पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने आदर सहित मानाचा मुजरा.
कार्यक्रमाच्या शेवटी महिला क्रीडा खेळांमध्ये बक्षिसाचे वितरण पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी च्या वतीने कुलर चे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रम रूपरेषाची महिला टीम- सौ रुपाली विधाते, सौ मनीषा लोकरे, सौ रेणुका जाधव, सौ सविता साळुंखे, सौ राजश्री कदम, सौ अमृता आनेराव, सौ कौशल्य राऊत सौ राधा घोंगाने, सौ पूजा सातारकर, सौ सुनिता मस्के, सौ अर्चना शिंदे, सौ वर्षा तरटे, सौ राजश्री निंबाळकर, सौ राजश्री माळी, वैभवी माळी, सौ राधिका पंडित.
तसेच सौ स्नेहल भिसे, प्रज्ञा बोराडे, मनीषा लोहरे, सुविधा टेकाळे, भाग्यश्री भोंडवे, आरती रणझुंजारे, मीनाक्षी कानडे, सुनीता शिंदे, प्रमिला हिंगमिरे, राधा मुसळे, अर्चना जगताप, उषा क्षीरसागर, मंजुश्री ब्याळी, रेखा कामशेट्टी, रूपाली चौधरी, प्रज्ञा चव्हाण, भारती सातारकर, सरस्वती सातारकर, आदी प्रतिष्ठित महिलांनी कार्यक्रमात उपस्थित सहभागी राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे आभार सौ. रूपाली विधाते यांनी व्यक्त
केले.