जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी येथे "जागतिक महिला दिन" उत्साहात साजरा.
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज.
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे.
बार्शी. (ता.बार्शी).बळेवाडी आज दि.08-03-2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक बळेवाडी शाळा येथे "जागतिक महिला दिन" कार्यक्रम अतिशय थाटात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ महिलांच्या हस्ते घेण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित महिलांचे रुमाल व गुलाब देऊन स्वागत करण्यात आले.
महिला दिनानिमित्त पाककृती आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत एकूण बत्तीस महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. यावेळी दर्जेदार पदार्थ आणि रांगोळी असल्याचे प्रथम तीन क्रमांक व सर्व सहभागी स्पर्धकांना ही बक्षिसे देण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांच्या वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, श्री छत्रपती शिवाजी महाराज, सैनिक दल पोलीस दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मला वाचवा म्हणून संदेश देणाऱ्या परी फुलपाखरू अशा विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी स्त्रियांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि सहवासातील प्रत्येकासाठी आनंदाचं झाड बनलं पाहिजे अशा शब्दात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी येथील उपशिक्षिका श्रीम. मगर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या शाळा व्यवस्थापन समिती बळेवाडी च्या अध्यक्ष सौ साळुंखे मॅडम, सर्व सदस्य, ग्रामसेवक सौ. घोळवे मॅडम, अंगणवाडी सेविका सौ सुचिता मोरे, मदतनीस सौ कमल सगरे, आशा वर्कर सौ अंजना पाटील, सर्व विद्यार्थ्यांचे माता-पालक, गावातील जेष्ठ महिला व तरुणी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
सर्व उपस्थितांना चहापाणी व खाऊ देऊन या बहारदार कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंद कायते सर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे संचालन श्रीम.मगर यांनी केले तर आभार सौ. मोरे मॅडम यांनी मानले.