*बार्शी मध्ये परगावावरून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना कोणीही त्रास दिल्यास पोलीस त्यांची गय करणार नाही; पो.नि. गिरीगोसावी*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
दुसऱ्यांदा पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी आव्हान केले आहे की, बाहेर गावावरून येणाऱ्या मुलींना, महिलांना कोणीही छेडछाड केल्यास त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल व त्याची गय करण्यात येणार नाही. तसेच कुठेही रस्त्यामध्ये वाढदिवस साजरा करू नये अन्यथा त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
रात्री 10 नंतर जर कोणी स्पीकर, डीजे लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच सोशल मीडियाद्वारे चरित्रहीनन,आक्षेपार्य विधान टाकल्यास त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल असा इशारा पो.नि.संतोष गिरीगोसावी यांनी केला. गिरीगोसावी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, बार्शी हे शैक्षणिक क्षेत्रात व मेडिकल क्षेत्रात पुढे जात आहे विनाकारण कोणावर अन्याय केला तर त्वरित कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
आणि बार्शीकरांना मी आव्हान करतो की, मी बार्शीसाठी नवीन नाही मला कोणीही हार-तुरे, पुष्पगुच्छ आणू नये त्या बदल्यात आपल्या घरी किंवा परिसरात एक झाड लावावे असे स्पष्ट मत बार्शी शहर पो.नि.गिरीगोसावी यांनी केली.