दिव्यांग्यांना आधार देउन मानुस्कीचे दर्षन घडवुया - अनिल देशमुख

1.

काटोल:- जिल्हा समाज कल्याण तथा आरोग्य विभाग अंतर्गत काटोल पंचायत समितीच्या मार्फत संपन्न झालेल्या नगर भवन काटोल येथे राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीपी योजने अंतर्गत सहाय्यक साधने व उपकरने वितरन कार्यक्रम संपन्न झाला. 448 दिव्यांगांना साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले.

यावेळी माननीय माजी गृहमंत्री आ.अनिलजी देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी दिव्यांग व्यक्तींना आधार द्यायचं आपले कर्तव्यच आहे ,त्यांना आधार देवुन मानुस्कीचे दर्षन घडवुया .असे भावनीक आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी सुद्धा दिव्यांगाना मार्गदर्षन केले.

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोरजी भोयर जिल्हा परिषद सदस्य सौ चापले ताई ,पंचायत समितीचे उपसभापती निशिकांत नागमोते, पस सदस्य धम्मपाल खोब्रागडे, प्रतिभाताई ठाकरे ,चंदाताई देव्हारे, लताताई धारपुरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखरजी कोल्हे ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखरजी चिखले ,अनुप खराडे, पंचायत समिती काटोलचे बिडिओ संजयजी पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रम प्रसंगी अनेक लाभार्थींनाश्रवन यंत्र, थ्री व्हीलर ,अंधा साठी स्मार्ट मोबाईल अंधांसाठी काठी ,व्हील चेअर,कंबरपट्टा ,कुबडी,मानेचा पट्टा,दाताचीकवळी,आदीअपंगाचे साहित्य यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी संचालन उत्तम झेलगोंदे, विस्तार अधिकारी तथा आभार प्रदर्शन प्रवीण गावंडे पंचायत समीती काटोल चे विस्ताराधिकारी यांनी केले.