लहान मुलांमध्ये जंतसंसर्ग टाळण्याकरिता जंतनाशक गोळी खाऊ घालणे गरजेचे” सभापति संजयजी डांगोरे यांचे आव्हान
1.
काटोल:- जंतामुले मुलांना रक्तक्षय, पोटदुखी, मळमळ, भूक मंदावणे यासोबतच कुपोषण, मुलांची वाढ खुंटावणे, जंत संसर्ग जर तीव्र स्वरूपाचा किंवा दीर्घकाळ असेल तर मुले सारखी आजारी पडणे व शिक्षणात त्यांचे लक्ष न लागणे असे दुष्परिणाम जंतसंसर्गामुळे मुलांमध्ये होतात, याकरिता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १ ते १९ वर्ष वयोगटातील काटोल तालुक्यातील १९० अंगणवाडी केंद्र, ११७ प्राथमिक शाळा, ४१ माध्यमिक शाळा, ५ आश्रम शाळा चे माध्यमातून आरोग्य विभागाच्या वतीने एकूण १९,४३५ मुला मुलींना आज दिनांक ०४/१२/२०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या दिवशी जंत संसर्ग टाळण्याकरीता जंतनाशक औषध खाऊ घालण्यात येणार आहे.
म्हणून मूल कुपोषित होऊ नये, मुलांना रक्तक्षय होऊ नये याकरिता आपण सर्वांनी व पालकांनी मुलांना जंतनाशकाची गोळी खाऊ घालून जनजागृती करण्याचे आव्हान काटोल पंचायत समितीचे सभापति संजयजी डांगोरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचारी सावंगा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र च्या वतीने आयोजित तालुका स्तरीय जंतनाशक दिनाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विचार व्यक्त करून आव्हान केले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालजी डिवरे अध्यक्ष शिक्षण समिति कचारी सावंगा तर प्रमुख अतिथि म्हणून संजयजी डांगोरे सभापति पंचायत समिती काटोल, डॉक्टर शशांक व्यवहारे तालुका आरोग्य अधिकारी काटोल, डॉक्टर कादंबरी उबरहांडे वैद्यकीय अधिकारी कचारी सावंगा, डॉक्टर प्रशांत नागपुरे, कांतेश्वरजी पाटील, देवरावजी मानकर, श्रीमती रवीनाताई निशाने, श्रीमती वैशालीताई खुरपुडे, श्रीमती कविताताई कोहळे, श्रीमती आम्रपली पाटील, ग्राम पंचायत समिति सदस्य / शिक्षण समिति सदस्य कचारी सावंगा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पनाताई मुसले यांचे उपस्थितीत घेण्यात आला. जंतनाशक मोहीम ही सर्वच शाळा, अंगणवाडी याठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक यांचे माध्यमातून खाऊ घातल्या जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शशांक व्यवहारे, संचालन राजू बगवे सर तर आभार प्रदर्शन प्रशांत विरखरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करीता राजू बगवे, सोनाली चव्हाण शाळेचे शिक्षक सोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी प्रताप वाडबुदे, प्रशांत विरखरे व शुभम सोरते, पद्मिनी राव,मनमथ जायवार, विकास सानप, पीयुष मिळमिळे, आंचल नगमोते, मेघा नागपुरे , सारिका धोटे यांनी परिश्रम घेतले.