मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर शहरातील करुणा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि करुणा माता चर्च स्टेशन रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वैजापूर ( प्रतिनिधी) :- मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर शहरातील करुणा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि करुणा माता चर्च स्टेशन रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके आणि शहर अध्यक्ष अशोक देवकर यांनी केले होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जागृती निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
या प्रसंगी करुणा निकेतन शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापक रेव्ह फादर संजय ब्राम्हणे यांनी उपस्थितांचे स्वागत करत वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. प्रतापराव निंबाळकर, तालुका अध्यक्ष विजय पवार, माजी सभापती एल. एम. पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष रमेश चोभे, तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नितीन तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष रमेश शिनगारे, तालुका उपाध्यक्ष आबासाहेब कळमकर, विजय खोमणे, शाळेचे मुख्याध्यापक बोधक सर, शिंदे सर, साळवे सर, भडके सर, गायकवाड सर, प्रकाश शेरे सर, पवार सर, रवि शेरे सर, प्रसाद सर, ब्रदर सर, उगले मॅडम, चव्हाण मॅडम, पवार मॅडम आणि रोमा मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे रोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी एकमेकांना वृक्षारोपणाची प्रेरणा देत भविष्यातही असे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा संकल्प केला.








