जुन्या पेन्शन बाबत महराष्ट्रातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांकरीता , आम आदमी पक्षाचं समर्थन !!
जुन्या पेन्शन बाबत महराष्ट्रातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांकरीता , आम आदमी पक्षाचं समर्थन !!
Delhi91-bps live news network
प्रतिनिधी- वाहिद शेख
सावनेर : (दिं.15) राज्य सरकारमधील 14 लाख कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू देखील करण्यात आलीय. त्यामुळे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी महाराष्ट्रातील कर्मचारी संघटनेने 14 मार्चपासून संपावर जाणार असल्याची भूमिका घेतली आहे . निवेदनाचा विषय जुनी पेन्शन योजना चालू करावी व जुन्या पेन्शन योजनेच्या समर्थनार्थ कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे . या आंदोलनाला आम आदमी पक्षाने आपला समर्थन दर्शविला आहे . एवढा मोठा कामाचा व्याप आणि ताण सहन करून कर्मचारी आपल्या आयुष्यात निवृत्त होई पर्यंत नोकरी करून शाशनास सहकार्य करतात . त्यानंतर जर यांना पेन्शन मिळाली नाही तर यांचे पुढील भविष्यात त्यांचे आयुष्य धोक्यात येते म्हणून जुनी पेन्शन लागू व्हायलाच पाहिजे .
या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात आम आदमी पक्ष आंदोलन करणार , असा निवेदनपत्र दिं.14 मार्च रोजी आम आदमी पक्षाच्यावतीने सावनेर प्रशासकीय कार्यालय स्थित नायब तहसीलदार कोहळे यांना देण्यात आला.
निवेदन देतांना नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय टेंभेकर , शहराध्यक्ष गजानन चौधरी ,शहर संघटन मंत्री मदन जी मोरे , तालुका अध्यक्ष संजय जी राऊत , तालुका महिला अध्यक्ष रुही शेख , तालुका उपाध्यक्ष वैशाली जंजाळ व समस्त आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते , सदस्य इत्यादि उपस्थित होते .