पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी केळवंडी शिवारात ज्वालाग्रही पदार्थ घेऊन जाणारा टँकर पेटला दोन महिला प्रवाशांचा होरपळून मृत्यू

ब्रेकिंग न्यूज
पाथर्डी तालुक्यातील माणीकदौंडी भागात केळवंडी शिवारात ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाणारा टँकर पेटला दोन महिला प्रवाश्यांचा होरपळून मृत्यु.
माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारात ज्वालाग्रही रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषण अपघात झाला असून या अपघातात टँकर पूर्णतः आगीच्या विळख्यात पडला आहे.या आगीत काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आह दरम्यान या टँकरमध्ये असलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर चार जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत असून जखमींवर पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान डिझेल टँकर उलटून अपघात झाला. टँकरमध्ये एकूण सहा प्रवाशी होते. त्यातील चौघांनी टँकरमधून उड्या मारल्या. तर दोन महिलांना बाहेर निघता न आल्याचे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.