"यशवंत पंचायत राज अभियान" राज्यस्तरीय पथक झाले समाधानी! काटोल पंचायतीने राबविले अनोखे उपक्रम

1.

काटोल:- यशवंत पंचायतराज अभियान राज्यस्तरीय तपासणी पथकाने काटोल पंचायत समितीने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल समाधान व्यक्त केले .समाज कल्याण, शिक्षण, वित्त ,मनरेगा, बांधकाम, पाणीपुरवठा ,सामान्य प्रशासन ,महिला बालकल्याण, आरोग्य ,कृषी ,पशुसंवर्धन आदी 17 विभागाची आढावा तथा तपासणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोश जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम टेकाडे, विस्तार अधिकारी श्री कोठे, विस्तार अधिकारी श्री कावळे आदी अधिकाऱ्यांनी काटोल पंचायत समितीने राबविलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

   

                 

काटोल पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती श्री संजय डांगोरे यांनी काटोल तालुक्याचा तथा विकास कामाचा आढावा आपल्या प्रास्ताविकामधून सादर केला. आभार प्रदर्शन खंडविकास अधिकारी श्री संजय पाटील यांनी केले .यावेळी निशिकांची नागमोते अनुराधा खराडे ,विस्तार अधीकारी प्रविन गावंडे,उत्तम झेलगोंदे,संतोश गोरटे,नरेश भोयर आदी अधीकारी,पदाधीकारी यावेळी उपस्थित होते.

यशवंत पंचायत राज अभियान या राज्यस्तरीय तपासणीने नागपुर विभागात समोर असणाऱ्या पंचायत समितीचा या तपासणीमुळे आता काटोल पंचायत समितीला राज्यावर आपला ठसा उमटण्याची संधी मिळाली आहे .तपासणी अधिकाऱ्यांनी मानवविकास अंतर्गत अभ्यास केंद्र तथा खुर्सापार ग्रामपंचायतला भेट दिली.तथा तालुक्यामधे राबविल्या जानारे विविध नाविन्यपुर्ण योजना ची माहीती जानुन घेतली.आपला अहवाल लवकरच चौकशी पथक मंत्रालयात सादर करणार आहे ,त्यावरून काटोल पंचायत समिती ही अधीकारी,पदाधीकारी तथा कर्मचारी यांच्या प्रयत्नाने राज्यांमध्ये उत्क्रुष्ठ ठरू शकेल,अशी आशा सभापती संजय डांगोरे यांनी आशी वेक्त केली.