*कलंबर (बु.) येथील समाजसेवेतील देव माणूस हरपला; लोहा तालुक्यात शोककळा*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
प्रतिनिधी- सम्मेद तरटे
कलंबर(बु.) ता. लोहा- मौजे कलंबर (बु.) येथील सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीतील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, सर्वांच्या विचारांशी एकनिष्ठ व समतावादी नेतृत्व असलेले उत्तमरावजी कोंडलवाडे यांचे दुःखद निधन झाले आहे.
त्यांनी समाजसेवेतून गाव सुधारण्याचा भरपूर प्रयत्न केला. आज युवा पिढीला नेतृत्व दाखवणारा खरा माणूस हरपला. सर्व गावांमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली. सर्वांच्या कामाशी एकनिष्ठ असून त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात काम केले. त्यांनी कलंबर येथील सरपंच पद भूषवले व गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांचे कार्य पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदी बसवले. अजून आपल्या गावचा विकास होईल या अनुषंगाने त्यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे गेले तिथे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना बीजेपीच्या तालुका उपाध्यक्षपदी नेमणूक केली. त्यांनी कधीही जातीभेद हा भेदभाव केला नाही. लहानांशी व थोरांची अतिशय आदराने, प्रेमाने बोलत असत. खरंच समाजसेवेतला व माणसातला देवमाणूस हरपला म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले-मुली अशा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
:- सम्मेद त्रिलोकचंद तरटे (कलंबरकर)