*पंढरपूर- विठुरायांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मिळणार दोन वेळेस महाप्रसाद*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
पंढरपूर- पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दिवसातून दोन वेळेस महाप्रसाद देण्याचा निर्णय माघी यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीने घेतला आहे.
पंढरपूर मंदिर समितीकडून हा निर्णय घेतल्यामुळे येणाऱ्या बाहेर गावावरून सर्व भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत पाहिले तर मंदिर समितीच्या माध्यमातून संत तुकाराम भवन मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी एक वेळेचे महाप्रसादाचे वाटप केले जाते. तसेच सर्व भाविक भक्तांची वाढती मागणी लक्षात घेता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यापुढे दररोज सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप केले जाईल असे सांगितले आहे. मंदिर समितीने या घेतलेल्या निर्णयानुसार दोन वेळेस महाप्रसादाचे वाटप सुरू केले आहे या महाप्रसादाची वेळ दुपारी 12 ते 2 केले जाते व संध्याकाळी पण भाविक भक्तांना महाप्रसाद 8 ते 10 वाजेपर्यंत मिळणार आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे अतिशय चांगल्या पद्धतीने सोय झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.