देशाला दिशा देणारं व्यक्तिमत्व शिक्षकही असते- संजय डांगोरे यांचे प्रतीपादन

1.

विद्यार्थी घडवुन  देश घडविनारे आणि देशाला योग्य दिशा देनारे  शिक्षकही असतात.असे विचार काटोल पंचायत समीतीचे सभापती संजय डांगोरे यांनी ३०जानेवारी ला जि.प.शाळेतील प्रकाश ढगे यांच्या सेवानिव्रुत्त समारंभा प्रसंगी व्यक्त केले. 

 

                            

काटोल तालुक्यातील जि.प. शाळा भाजिपानी येथून नियत वयोमानुसार सेवानिवृत्त होणारे आदर्श  शिक्षक  श्री.प्रकाशजी ढगे यांचा नुकताच  शिक्षण परिषदे मध्ये सेवानिव्रुत्त झाल्याबद्दल  सपत्नीक शाल श्रीफळ देउन संजय डांगोरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.     यावेळी काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी झिल्पा आणि ढवळापुर केंद्रामध्ये सर्व शिक्षक यांना शिक्षण परिषद,दप्तरमुक्त शाळा ,दिशा उपक्रम तथा शिक्षकीपेशा मध्ये राहून तुकडोजी महारांजाना अपेक्षीत ग्रामसेवा कशी करता येईल याबद्दल बहुमोल विचार व्यक्त केले .                 

 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती निशिकांत नागमोते ,प्राध्यापक वीरेंद्र इंगळे, अनिल ढोपरे ,केंद्रप्रमुख पांडुरंग भिंगारे ,सतीश महाजन ,सरपंच सीमाताई युवनाते ,चित्रकला ढगे,धिरज ढगे,सरिता राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन वनिता राऊत आणि आभार प्रदर्शन चिंचमालापुरे यांनी मानले. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी तथा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.