शेवगाव तालुक्यातील पुरवठा विभागाच्या चुकीच्या बातम्या पसरवणाराच निघाला हप्ते वसुली खोर
शेवगाव तालुक्यात पुरवठा विभागाच्या चुकीच्या बातम्या पसरवणारा निघाला हप्ते वसुली खोर
शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणारे हे वारंवार पैशाच्या मागण्या करत आहेत प्रशासन असो कि सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा आर्थिक देवाण-घेवाण यांचा त्रास.
बातमी चुकीची आहे असे स्पष्ट जाणवत आहे याचे स्पष्ट पुरावे मागवले पाहिजेत तसे काही महाकंठकांना अंधारात पैसे मागवायची सवय आहे तसेच कर्मचाऱ्यांनी देवाणघेवाण केली नाही तर त्यांच्या विरोधात बातम्या लावायच्या व चाललेल्या प्रशासनाच्या कारभाराला वेगळे स्वरूप देऊन बातमी लावायची त्यामुळे या बातमीची समक्ष प्रशासनाने दखल घेऊन शहानिशा करावी ही जी बातमी कुणीही टाईप केली असेल त्यांनी या अगोदर पैशाची मागणी केल्याचे स्पष्ट जाणवते कारण की पुरवठा विभागांमध्ये दोन वर्ष भोंगळा कारभार चालला होता त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचे कामे होत नव्हते त्यानंतर तेथील तात्कालीन एसआय यांचे कागदावरती स्पष्ट पुरावे मागून घेऊन कार्यालय प्रमुखांनी पदाचा पदभार काढून संबंधित पुरवठा अधिकारी यांच्याकडे एसआय पदाचा पदभार दिला असून सर्वसामान्य नागरिकांच्या हिशोबाने गेले दोन तीन महिन्यापासून शेवगाव पुरवठ्याचा कारभार सुरळीत चालू झालेला आहे व चालत आहे असे सर्वसामान्य जनतेकडून ऐकवायला मिळते
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कामाबाबद ओरड कमी झाली आहे व दोन वर्ष रखडलेले कामे तेथील कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी व रात्री उशिरापर्यंत थांबून पूर्ण केल्याचे स्पष्ट कागदावरती दिसून येत आहे त्यामुळे थोडेफार जे काम आहे ते तांत्रिकदृष्ट्या ऑनलाइन सिस्टीम तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या माहिती वेळेत देणे बंधनकारक असते त्यामुळे जे थोडेफार काही जे कामे आहेत ते कामे थोड्या दिवसांमध्ये पूर्ण होताना दिसून येतील असे संबंधित अधिकाऱ्यांकडून ऐकवयास मिळते महिन्याभरापासून शिधापत्रिकांची आता ऑनलाईन प्रोसेस चालू झाल्यामुळे रेशन कार्ड ची प्रोसेस ही ऑनलाईन झाल्यामुळे संबंधित पुरवठा विभागाकडे रेशन कार्ड देणे बंद झाले आहे असे समजते त्यामुळे संबंधित पुरवठा अधिकारी व एसआय पदाचा पदभार दिलेल्या श्रीमती पवार मॅडम यांच्यावरती आरोप लावल्याचे स्पष्ट जाणवत आहे व एक महिला कर्मचारी दोन पदाचे पदभार चांगल्या प्रकारे पुरवठ्यामध्ये काम करत असताना त्यांची दिशाभूल करणे व त्यांना मानसिक त्रास देणे त्यांना पैशाची मागणी करणे हे योग्य वाटत नाही त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर अशा शब्दाचा अर्थ अधिकारी यांनाच पडला आहे की नेमकं चांगले काम करत असताना अधिकाऱ्यांना त्रास कशासाठी म्हणून कार्यालय प्रमुखांनी या बातमीची स्पष्ट शहानिशा करून संबंधित बातमीदारांना समक्ष कार्यालयामध्ये बोलून घेऊन विचारणा करावी कारण की चांगले कर्मचारी कार्यालयातून किंवा शेवगाव तालुक्यातून वैतागून जाणे ही योग्य नाही व खात्याची बदनामी होणे हे योग्य नाही त्यामुळे संबंधित बातमीदारांना तात्काळ कार्यालयांमध्ये कार्यालय प्रमुखांनी बोलून घेऊन शहानिशा करणे गरजेचे आहे तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वच्छ प्रतिमेने काम करणे गरजेचे वाटत आहे तसे होत नसताना दिसल्यास संबंधित बातमीदारांची तक्रार त्यांच्या हेड ऑफिसला कळवली जाईल असे पण जनतेतून आवाज उठत आहे त्यामुळे पूर्ण शहानिशा करणे गरजेचे आहे तसेच सध्याची परिस्थिती अशी जाणवत आहे की चांगले कर्मचारी तिथून बाहेर काढायचे व भ्रष्टाचारी कर्मचारी पुरवठ्यामध्ये पाठवून सर्वसामान्य जनतेची हेळसांड करायची व नुसता पैसा गोळा करायचा यासाठी संबंधित बातमीदार यांना कोणी खतपाणी घालतोय का याची पण विचारपूस होणे गरजेचे वाटत आहे कारण की तालुक्यामध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठ्याचे काम वरिष्ठ कार्यालयाच्या माहितीची कामे पूर्ण झाल्याची स्पष्ट अहवालातून जाणवले व जाणवत आहे त्यामुळे याची पूर्ण शहानिशा करावी तसे असेल तर बातमीदाराने वरिष्ठ कार्यालयाला कलेक्टर ऑफिसच्या डी एस ओ मॅडम बडे यांना शेवगाव तालुक्याची पुरवठा विभागाची दोन तीन महिन्याची परिस्थिती काय आहे याची पत्रव्यवहार करून शहानिशा करावी व विचारावी मग खरोखर अंध धुंदी कारभार चालत असेल तरच तुम्ही या गोष्टीचा पोलखोल करावा अन्यथा उगाच चांगल्या कार्यालय प्रमुखांची व पुरवठ्यातील महिला कर्मचाऱ्यांची उगाच बदनामी करणे योग्य वाटत नाही म्हणून सविस्तर असे की चांगले काम होत असताना अधिकाऱ्यांना मुलाखती घेणेच्या धमक्या देणे विनाकारण दररोज कोणी ना कोणीतरी कुणाच्यातरी सांगण्यावरून अधिकाऱ्यांवरती प्रेशर टाकून हप्ते वसुली करायची त्यांची हेळसांड करणे कामाचे लक्ष विचलित करणे हे योग्य वाटत नाही त्यामुळे एकदाच या गोष्टीची शहानिशा करावी ही विनंती अन्यथा या गोष्टीवरतीच एखाद्या कर्मचाऱ्यांनी बदनामी होताना दिसून आल्यास अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल केला तर महागात पडू शकतो त्यामुळे अशा महाकंठकांना उगाच बाजीराव म्हणून डोक्यावरती बसून घेऊन प्रशासनाचं किंवा सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान करू नये याची खबरदारी घेणे गरजेचे वाटते त्यामुळे कोण आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय हेच कळायला मार्ग नाही असे होता कामा नये
तसेच कार्यालय प्रमुख मा.तहसीलदार/दंडाधिकारी श्री.प्रशांत सांगाडे यांनी सर्वसामान्य नागरिकांचे बरेचसे प्रश्न मार्गी लावले व प्रशासकीय कारभार चांगल्या प्रकारे चाललेला दिसून येत आहे. तसेच श्रीमती मंगल पवार मॅडम पुरवठा अधिकारी यांनी सुद्धा पुरवठ्यातील प्रशासकीय कारभार तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे चालवल्याचे दिसून येत आहे.