सावनेर तालुक्यात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली .
सावनेर तालुक्यात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली .
प्रतिनिधी - वाहिद शेख
सावनेर : (दि.1जून ) सावनेर येथील विश्राम ग्रह येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 299 वी जयंती 31 मे 2024 शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे उपस्थित होते .प्रमुख अतिथी म्हणून ऍड सूरज भोंगडे , प्राचार्य महादेव खरबडे , सेवानिवृत्त नगर भूमापन अधिकारी गुलाब टेकाडे इत्यादि असून मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची पूजा- अर्चना आणि पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी प्रा. बाबा टेकाडे म्हणाले की महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी (सध्याचे अहमदनगर) गावात झाला होता. अहिल्याबाईंना भारतीय इतिहासातील उत्कृष्ट महिला शासकांपैकी एक मानले जाते. ज्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असे म्हणत प्रा. बाबा टेकाडे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी हिरालाल आगरकर , यशवंत पाटील , विठ्ठल खाटीक , श्रीधर टेकाडे , नारायण बोबडे , रामेश्वर चाके , महादेव आगरकर , रामभाऊ तवले , रमेश बांबल , हरी तवले , नामदेव चाके , विष्णु तवले , अजाब आगरकर , शोभा चाके , मिनक्षी आगरकर , वर्षा आगरकर , शशिकला तवले आदी प्रामुख्याने उपस्थिती होते .
तसेच सावनेर तालुक्यातील टेंभुरडोह गाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा.बाबा टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते . यानिमित्त भव्य रॅलीसह विविध कार्यक्रम करण्यात आले . या अभिवादन कार्यक्रमास टेंभुरडोह परिसरातील असंख्य धनगर समाजाच्या बंधू-भगिनी यांनी सहभागी होऊन आपली उपस्थिती दर्शविली .