दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - आता शाळेत 75 टक्के उपस्थिती असणार बंधनकारक .

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - आता शाळेत 75 टक्के उपस्थिती असणार बंधनकारक .

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - आता शाळेत 75 टक्के उपस्थिती असणार बंधनकारक .

Bpslivenews network

महाराष्ट्र राज्य :

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता पण आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना हे आदेश जारी करण्यात आले आहे. पुढील वर्षी अर्थात 21 फेब्रुवारी 2023 पासून बारावीच्या तर 2 मार्च 2023 पासून दहावीच्या परीक्षा सुरु होण्याची शक्यता आहे.

किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दांडी मारणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.