नागपूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार दिलीप घोरमारे यांची निवड करण्यात आली .

नागपूर जिल्हाध्यक्षपदी  पत्रकार दिलीप घोरमारे यांची निवड करण्यात आली .

--------------------------------------------------------------------------

नागपूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार दिलीप घोरमारे यांची निवड करण्यात आली .

--------------------------------------------------------------------------

प्रतिनिधी - वाहिद शेख 

सावनेर: ( दि.25 नोव्हेंबर) पत्रकाराच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपले कार्य तसेच मूल्य आधारित पत्रकारिता विचारधारा कायम राहावी तसेच आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व संघटनेच्या सर्व स्तरावर संघटनेच्या मूल विचारधाराचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने दिलीप घोरमारे यांची पत्रकारितेमधील उज्वल कारकीर्द पाहून व्हॉईस ऑफ मीडियाच्या (डिजिटल मीडिया विंग) नागपूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली .

भारतातील नंबर १ ची असलेली व जागतिक पातळीवर ४७ देशात ३ लाख ९० हजार पत्रकार सदस्य असणारी संघटना म्हणजेच व्हॉईस ऑफ मीडिया होय .

दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता व्हॉईस ऑफ मीडिया (डिजिटल मीडिया विंग) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारणी तसेच जिल्हाध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा मोऱ्या फंक्शन हॉल बार्शी, ता.बार्शी जि.सोलापुर येथे आयोजित करण्यात आला होता . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हाईस ऑफ मीडिया संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची उपस्थिती प्रामुख्याने लाभली होती .या दरम्यान व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे , हर्षद अशोक लोहार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आश्विन पुरी महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत व्हॉईस ऑफ मीडियाच्या (डिजिटल मीडिया विंग) नागपूर जिल्हाध्यक्षपदी मा.श्री.दिलीप घोरमारे ( इंडिया लाईव्ह तेज न्युजचे मुख्य संपादक ) यांची निवड करण्यात आली.

या दरम्यान त्यांच्या सोबत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पत्रकार मंगेश उराडे , पत्रकार गिरीश आंदे व्हॉईस ऑफ मीडिया नागपुरचे जिल्हा सदस्य व ईतर पाहूणे मंडळी उपस्थित होते.