सावनेर - पहेलेपार शिवमंदिर परिसर येथे मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा करण्यात आला .
1.
सावनेर - पहेलेपार शिवमंदिर परिसर येथे मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा करण्यात आला .
ब्यूरो रिपोर्टर - वाहिद शेख
सावनेर : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यामध्ये विदर्भात, पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते. मात्र, लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस मजेसाठी तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात.
मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा हा सण येतो. या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका येथील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही तान्हा पोळा हा सण सावनेर - पहेलेपार येथे मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला, यामध्ये कोरोना सारखी साथ या जगातून कायमची नाहीशी व्हावी अशी प्रार्थना स्थानीय नागरिकांद्वारे मारबत काढून करण्यात आली.
सर्व नंदी बैलांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्याकारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केला. त्यानंतर मुलांना काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केलेला असून व लहान मुलांना भेटवस्तू , खाऊ , बिस्कीट आणि इतर सामग्री देऊन या पोळ्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला . या कार्यक्रमात पहेलपार येथील शेकडो उत्साही मुलांनी सहभाग घेतला .
कार्यक्रमाला यशस्वीरीती साजरा करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास शर्मा, चंद्रशेखर लाडेकर, नितीन वकील, स्वप्नील घायार, शुभम ढोके, गजेंद्र लाडेकर, राजेश हजारी, मनीष शर्मा, विजय ताजने, प्रशांत लाडेकर व रुपेश शर्मा व सर्व स्थानीय नागरिकांनी सहकार्य केले .