*जालोर,राजस्थान घटनेतील मुख्याध्यापकास फाशी द्या* *वंचित बहुजन आघाडी ची मांगनी*                  ‌‌               

*जालोर,राजस्थान घटनेतील मुख्याध्यापकास फाशी द्या* *वंचित बहुजन आघाडी ची मांगनी*                  ‌‌               

*जालोर,राजस्थान घटनेतील मुख्याध्यापकास फाशी द्या* *वंचित बहुजन आघाडी ची मांगनी*                  ‌‌                                  बी .पी.एस लाईव्ह न्यूज नेटवर्क                               ‌      ‌‌        नागपूर:- देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना राजस्थान च्या जालोर येथील 9 वर्षीय शालेय विद्यार्थी इंद्र मेघवाल याने तथाकथित उच्च जातीतिल सवर्ण मुख्याध्यापकाच्या माठातील पाणी घेतले.या कारणास्तव शिक्षकाने जातियवादी मानसिकतेतुन विद्यार्थ्यांला अमानुषपने मारहाण करून हत्या केली ही घटना मानवतेला काळीमा फासनारी आहे या घटनेच्या वंचित बहुजन आघाडी चिचोली सर्कल तर्फे जाहिर निषेध करीत खापरखेडा शहर ,मेंन रोड येथे कैंडल मार्च द्वारा श्रद्धाजंली देण्यात आली.वंचित बहुजन आघाडी जिल्हामहासचिव अजय सहारे यांचा

नेतृत्वात पोलिस निरीक्षक खापरखेडा पोलिस स्टेशन मार्फ़त देशाच्या पंतप्रधान ला निवेदन दिले. नागपुर जिल्हासह सम्पूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. समाज व देश घडविन्याची जवाबदारी असणाऱ्या शिक्षकाने जातीयवादी मानसिकतेतुन अशा प्रकारे कृत्य करने देशासाठी अंत्यत हादरा देणारी असून धक्कादायक आहे.देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना अशी घटना लज्जास्पद आहे. कैंडल मार्च व श्रद्धाजंली कार्यक्रमात सामाजिक समस्या निवारण समिति चे अध्यक्ष सुरेंद्र सोमकुवर, कोषाध्यक्ष नरेश कनोजे,गंगाधर पाटिल,कविता मेश्राम,छाया सहारे,सचिन खंडारे,राजू गुडधे,,मुकेश वासनिक,मिथुन सहारे,संघपाल गजभिये,रमा सहारे,वंदना वासनिक,अश्विनी सहारे,पूनम बोरकर,निशा सहारे विद्यार्थी व पदाधिकारी मोठ्या संखेत उपस्थित होते.