कोलगाव येथील अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई द्या*
1. २
*कोलगाव येथील अतिक्रमण धारकांना नुकसानभरपाई द्या*
-समता सैनिक दलाची मागणी*
बी पी एस लाईव्ह न्युज दिल्ली
नागपूर:-सेलू तालुक्यातील कोलगाव येथील अतिक्रमण धारकांची कायमस्वरूपी राहण्याची पर्यायी व्यवस्था करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील कोलगाव येथील १२आदिवासी कुटुंबे ग्रामपंचायतच्या गावठाण जागेवर मागील ७ वर्षांपासून तट्टया बो-याच्या झोपड्या बांधून राहात होते.
परंतु सर्व नागरिक आपापल्या कामाला गेले असता घरी कोणीही नसतांना दुपारी १ वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरावर बुल्डोजर चालवून त्यांच्या संसाराची राखरांगोळी केली व घरे पाडली.आज ते सर्व कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत.ही सर्व कुटुंबे रोजमजुरी करून कसाबसा आपला उदरनिर्वाह करीत होती.यात लहान बालकांसह वयोवृद्धांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.परंतु प्रशासनाने त्यांच्या उपजिविकेचा कसलाही विचार न करता अतिक्रमण काढण्याची कारवाई केल्यामुळे घरातील अन्नधान्य तसेच जिवनावश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही बाब अतिशय संतापजनक असून मनाला पटण्यासारखी नाही.
सदर घटनेची गंभीरतेने दखल घेऊन पिडीत कुटुंबाची पर्यायी व्यवस्था करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा तीव्र आदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे,जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, मार्शल चंदु भगत, मार्शल अमोल ताकसांडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भलावी,अविनाश भलावी, मंगेश किरनाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.