*कायदेशीर नोटीस देताच पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची लेखी माफी मागितली*

1.

*कायदेशीर नोटिस देताच पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाची लेखी माफी मागितली*

बि पि एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज दिल्ली                                                  

सावनेर:-सविस्तर घटना अशी की खापरखेडा येथील पत्रकारउपसंपादक शेखर कोलते हे जानेवारी 2022 मध्ये जगदंबा पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरते वेळी कर्मचारीच्या हाताने साड़े तिनशे ते चारशे रूपयाचे पेट्रोल खाली सांड़ले होते . या झालेल्या नुकसान बद्दल कोलते यांनी पेट्रोल पंप चे मॅनेजर कडे तक्रार केल्यामुळे त्या

कर्मचार्‍याद्वारे कोलते यांना मानसिक त्रास दिला जात होता , त्यामुळे कोलते यांनी पेट्रोल पंप संचालक व मॅनेजर यांना कायदेशीर नोटीस देऊन त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. नोटीस मिळताच जगदंबा पेट्रोल पंपचे मॅनेजर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना फटकारत त्यांच्याकडून लेखी माफीनामा लिहून घेतला व सोबतच कोलते यांना लेखी हमी पत्र देऊन अशी घटना अन्य कोणत्याही ग्राहकां सोबत होणार नाही अशी हमी दिली व त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनुक बद्दल दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली आहे .