डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती श्रीवासनगर महादुला तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त सत्कार समारंभ, मुलांना सायकल वाटप आणि शालेय पुस्तकाचे वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आले !!

1.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती श्रीवासनगर महादुला तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त सत्कार समारंभ, मुलांना सायकल वाटप आणि शालेय पुस्तकाचे वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आले !!

सावनेर: श्रीवासनगर महादुला येथे सत्कार समारंभ ला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक  रत्नदिपभाऊ रंगारी, नगरसेवक मोसीम शेख नगरसेविका अश्विनी वानखेडे, बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुषमा रंगारी या उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अयुप परीपगार डान्स गृप ने झाली. कार्यक्रम मध्ये विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगीरी करणा-या लोकांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारमुर्ती मध्ये झुंड सिनेमातील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या  तक्षशिलाताई वागधरे, माजी जिल्हा परिषद सदस्या तसेच सहकलाकार यांचा सन्मान करण्यात आला. मनोरूग्णांची सेवा करणारे हितज्योति आधार फाउंडेशन चे हितेशदादा बन्सोड तसे कोरोना काळात सेवा देणारे डॉ आशिष सूंडे, डॉ अमित कूरूटकर आणि वर्तमान पत्र विक्रेता प्रभाकरजी हेटे यांना सन्मानित करण्यात आले. समिती मार्फत दहावी च्या परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्याा अंजली पारधी यांना सायकल भेट देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे अशा विद्यार्थ्यांना समिती मार्फत शिष्यवृत्ती दहा हजार रुपये देण्यात येते त्या पैकी पहीला हप्ता प्रत्येकी पाच हजार रुपये चे धनाादेश (चेक )ईशाली बांगरे आणि प्रियदर्शनी रामटेके यांना देण्यात आले. कोरोना काळात पती गमावल्या मुळे आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या पुस्तकला मेहरकर यांना पाच हजार रूपये आर्थिक मदत देण्यात आली. तसेच १२० विद्यार्थ्यांना शालेय रजिस्टर पुस्तक देण्यात आले.

यावेळी समिती चे संजय रामटेके, दयाल शाहु, राजु जरवार, संदीप खोब्रागडे, दिपक चव्हाण, निखिल खरवडे, नरेश सामृतवार, संदीप खोब्रागडे, आकाश रंगारी, भैय्या परीहार, आशिष जरवार, कैलास शेंडे, प्रदिप खोब्रागडे, पंकज खुबेले, सचिन चुटे, सुनिल परीहार, सुनिल खोब्रागडे, हर्ष परीहार, हरीश सोमवंशी, बबलु मस्करे, शुभम सोमवंशी, तुफैल वहीद,कैलास शेंडे, गणेश लाडे, मुकुल राहांगडाले, सिध्दार्थ खोब्रागडे,आकाश वंजारी, सागर चौधरी, संदीप मेश्राम, मुकुल राहांगडाले, सुनिल परीहार, विक्की खोब्रागडे, कार्तिक बोरकर, राकेश बोरकर, विशाल सोमवंशी, प्रविण सोमवंशी, राहुल वंजारी, अंकीत कांबळे, शालीक कापसे, राजकुमार राहांगडाले, संजय येडे, तुळशीराम कापसे,बबलु मस्करे, निलेश मेश्राम, दद्दु पाटील, प्रविण वानखेडे, सुरभी मेश्राम, प्रज्ञा रामटेके, नताशा अडकने, पुजा चव्हाण, कोमल करमकर, उपस्थित होते. 

संचालन आणि आभार संजय रामटेके यांनी केले.