रोकडोबा महाराजांच्या उत्सवा निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन श्री बी ग्रुप व प्रशांत मोरे ठरले फायनल चे मानकरी

पुणे प्रतिनिधी- तीर्थक्षेत्र येलवाडी येथे श्री रोकडोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त जवळपास ८ वर्षानंतर गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.बैलगाडा शर्यत वरील बंदी उठल्यानंतर गावातील सर्व गाडामालक आणि गाडाशौकीन यांनी एकत्र येऊन नवीन घाटाचे बांधकाम केले.व त्यामध्ये लाखो रुपये व ३ दुचाकी चे बक्षीस ठेऊन गावात प्रथमच बैलगाडा शर्यती घेण्यात आल्या.पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी एकत्र येऊन घाटाचे उद्घाटन करून बैलगाडा शर्यतींना सुरवात करण्यात आली.या शर्यतीमध्ये एकूण २५५ बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला होता.दोन दिवस पार पडलेल्या या शर्यती मध्ये पहिल्या दिवशी श्री बी ग्रुप तळवडे यांचा गाडा प्रथम आला तर कै सहादुमामा काळोखे यांचा गाडा २ नंबर मध्ये तर तुकाराम शिवाजी बोडके यांचा गाडा ३ नंबर मध्ये आला.त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रशांत मोरे यांचा गाडा प्रथम आला व विशाल बांगर २ नंबर तर गुलाबराव किसनराव गिलबिले यांचा गाडा ३ नंबर मध्ये आला.व दोन्ही दिवसात सर्वात आतून आलेला गाडा म्हनजेच घाटाच्या राजाचा मान श्री बी ग्रुप तळवडे यांना मिळाला.शर्यतीमध्ये विजेत्यांना रोख रक्कम,चषक,व दुचाकी गाड्या बक्षीस देण्यात आल्या