*बार्शी येथील "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी "पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीम" सेवेत तत्पर.*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. (ता.बार्शी) दि.१४-०४-२०२२ रोजी बार्शी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात शांततेने पार पडली.
गेल्या दोन वर्षापासून म्हणजेच (कोरोनाच्या महामारी काळात) जयंती ही शासनाचे नियम पाळून साजरी केली नव्हती पण ह्या वर्षी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून कोरोनाचे नियम हटविण्यात आले. त्यामुळे बार्शी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय हर्षोल्हासात, शांततेत मोठ्या प्रमाणात सर्व भीमसैनिकांनी व सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येऊन साजरी केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामदास शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीम ही बंदोबस्तासाठी तत्पर होती. जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक श्री शेळके साहेब यांनी पोलीस जाणीव सेवा संघाच्या प्रत्येकी दोन पदाधिकाऱ्यांसोबत बाहेरून आलेल्या पोलिस मित्रांची 15-15 जणांची टीम देण्यात आली.
यामध्ये महिला पोलीस जाणीव सेवा संघाने ही डॉ.आंबेडकर यांच्या जयंती बंदोबस्तात सेवा देऊन कामगिरी केली. पोलीस जाणिव सेवा संघाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत आपले कार्य पूर्ण केले. त्यावेळी पोलीस निरीक्षक श्री शेळके साहेबांनी पोलीस जाणीव सेवा संघाचे आभार मानले पोलीस जाणीव सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी आपल्या कार्यासाठी केव्हाही तत्पर राहू असे आश्वासन दिले.
पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री स्वप्निल इज्जेपवार, पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण सिरसाट, पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश कर्णावल, पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकळ, यांच्या सानिध्यात पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका विभाग प्रमुख- श्री उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- श्री समाधान विधाते, तालुका संपर्कप्रमुख- श्री सम्मेद तरटे, बार्शी शहरअध्यक्ष- श्री अभिजीत माळी, संघाचे मार्गदर्शक- श्री भगवान लोकरे सर सदस्य- श्री विजय माळी, श्री दत्ता माने.
तसेच पोलीस जाणीव सेवासंघ महिला टीम- बार्शी तालुका अध्यक्षा- सुप्रियाताई काशीद, तालुका संपर्क प्रमुख- रूपालीताई विधाते, उप संपर्कप्रमुख- अमृताताई आनेराव, शहराध्यक्ष- मनिषाताई साळुंखे, शहर कार्याध्यक्ष- राधाताई घोंगाने, शहर उपाध्यक्ष- कौशल्याताई राऊत, संघटक- पूजाताई सातारकर यांनी या बंदोबस्तासाठी तत्पर राहून उल्लेखनीय कामगिरी केली.