साहित्तिक लेविन भोसले यांचे लेखन, साहित्यिक कार्य युवक व समाज यांना प्रेरणादायी - फा.ज्यो गायकवाड.

साहित्तिक लेविन भोसले यांचे लेखन, साहित्यिक कार्य युवक व समाज यांना प्रेरणादायी - फा.ज्यो गायकवाड.

श्रीरामपूर  :-- येथील लोयोला सदन चर्च मध्ये लेविन भोसले यांची शब्दगंध साहित्यिक परिषद श्रीरामपूर शाखा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचा चर्च मध्ये फा.संपत भोसले   संचालक सेंट झेवियर टेक्निकल व सहाय्यक धर्मगुरू लोयोला सदन यांचे हस्ते व फा.ज्यो  गायकवाड प्रमुख धर्मगुरू संत लोयोला चर्च यांचे उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी फा.ज्यो गायकवाड यांनी वरील उद् गार काढले.
    या प्रसंगी फा.ज्यो  गायकवाड यांनी लेविन भोसले यांच्या कार्याविषयी माहिती दिली.लेविन भोसले हे सर्व समाजात उत्कृष्ट पणे कार्य करीत आहे .चर्चला याबद्दल अभिमान आहे.त्यांचे साहित्यिक कार्य खूप महान आहे .त्यांचे विज्ञान जिज्ञासा, वेध सामाजिक जाणिवांचा, कानोसा समाज मनाचा हे तीन पुस्तके प्रकाशित असून ते विविध साहित्य संमेलनात सहभागी असतात.       लेविन भोसले हे संत तेरेजा बाॅईज हायस्कूल हरेगाव येथे पर्यवेक्षक सेवानिवृत्त शिक्षक आहेत.त्यांचे विज्ञान जिज्ञासा, वेध सामाजिक जाणिवांचा, कानोसा समाज मनाचा हे तीन पुस्तके प्रकाशित असून त्यांचे विज्ञान जिज्ञासा या पुस्तकामुळे त्यांची आकाशवाणी केंद्रावर मुलाखत घेण्यात आली होती.त्यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.वेध सामाजिक जाणिवांचा यि पुस्तकाचे परिक्षण सुवार्ता मासिकात संदिप राऊत यांनी केले होते ‌.वेध सामाजिक जाणिवांचा, कानोसा समाज मनाचा या पुस्तकांना वाचन संस्कृती प्रतिष्ठान, चा मानाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला आहे.                                                        लेविन भोसले हे विविध साहित्य संमेलनात सहभागी होऊन विविध प्रकारच्या विषयावर आपले विचार व्यक्त केले आहे .वस ई येथे झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात सहभागी होऊन धर्म विज्ञान सुसंगत की विसंगत, तसेच वस ई मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन मराठी भाषा स्थिती गती या विषयावर आपले विचार व्यक्त केले.मराठी भाषा दिनानिमित्त सात्रळ येथील महाविद्यालयात मराठी भाषा दिन महत्व याविषयी युवक युवती समोर आपले विचार व्यक्त केले.नुकतेच श्रीरामपूर येथे निरोप्या लेखक,वाचक,वितरक यांचा मेळावा घेण्यात आला होता.त्याचे उद् घाटक नाशिक धर्मप्रांताचे बिशप लुडस डॅनियल यांनी केले,निरोप्याचे संपादक फा.भाऊसाहेब संसारे व प्रमुख वक्ते म्हणून लेविन भोसले होते.त्यांनी माझी साहित्य क्षेत्रातील वाटचालीत निरोप्याचा मोलाचं वाटा असून त्यात विविध विषयांवर लेखन करण्याची संधी मिळाली.मी लेखक व साहित्यिक कसा झालो यावर सुमारे एक तास मनोगत व्यक्त केले.                  लेविन भोसले हे विविध मराठी व इंग्रजी शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण, वार्षिक क्रिडा महोत्सव आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त केले आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊनच शब्दगंध साहित्यिक परिषद ने त्यांची श्रीरामपूर शाखा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड केली.याप्रसंगी बहूसंख्य भाविक उपस्थित होते.या सत्कारानंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी श्री व सौ बोर्जस, श्री व  सौ.कोळगे,श्री व सौ शिणगारे,श्री व सौ.गायकवाड, निशीकांत प़ंडीत,दिपक,अमोल कदम,संजय लोंढे, भालेराव, पवार,राजू भालेराव व सौ.भालेराव, फ्रान्सिस कदम, कमलाकर पंडित ,हिवाळे,सौ.लिहीणार,संतोष येवले,आद्रेस भोसले, भगवान भालेराव, संसारे,आदिनी अभिनंदन केले