शेवगाव शहरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले. पोलिसांपुढे आवाहण :-कारवाई होत नसल्याने धाडस वाढले
शेवगाव :-घरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिक धास्तावले आहेत. घर दुकाने रुग्णालय व सरकारी कार्यालयासारख्या वरदळीच्या ठिकाणावरून वाहनाची चोरी होत आहे. गेल्या आठ दिवसात चार ते पाच दुचाकी चोरी झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.
शेवगाव तालुक्यासह शहरातून भर मध्यवस्तीत नागरिकांच्या घरासमोरून मुख्य रस्त्यावरील दुकानासमोरून वरदळीच्या चौकातून रुग्णालय कार्यालय मंगल कार्यालय आधी ठिकाणावरून वाहन तळावरून उभा केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने चोराचे सत्र गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे चोरटे वाहने चोरताना अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊन देखील शेकडो वाहनाचा तपास लागलेला नाही वाहनतळावर उभी केलेली वाहने अवघ्या काही मिनिटांमध्ये पाळत ठेवून गायब केले जात असल्याने शहरात या वाहन चोरी मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने चोरट्याचे धाडस वाढले असून नागरिक प्रचंड दास्तावले आहेत मागील महिन्यात एका चारच्या किंवा अनाथ दहा ते पंधरा दुचाकी चोरीस गेल्या तर या आठवड्यात संभाजी देहादरा यांची दुचाकी शिवाजी चौकातील घरासमोरून रात्रीच्या वेळी सेवानिवृत्त शिक्षक अशोक शेवाळे यांची दुचाकी आंबेडकर चौकातील गायकवाड हॉस्पिटल समोरून तर दिनेश वाणी यांच्याकडील दुचाकी भारदे विद्यालयात शेजारील मयूर मेडिकल समोरून दुपारी चोरीस गेली.
याबाबत संबंधितांच्या फिर्यादीवरून चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला मोटरसायकल चोरट्याचा फोटो.