महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील प्रकल्पग्रस्तांसाठीच्या विशेष भरती मोहिमेस विद्यापीठाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ .

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील प्रकल्पग्रस्तांसाठीच्या विशेष भरती मोहिमेस विद्यापीठाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ .

प्रकल्पग्रस्त धारकांनी विद्यापीठाच्या मेनगेटवर सुरू केले अन्नत्यात उपोषण .

1. शासनाने दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती प्रक्रियेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. 

2. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारे दि. 31 डिसेंबर 2024 रोजी प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती प्रक्रिया जाहिरात प्रसारित करण्यात आली 

3. जाहिरात प्रसिद्ध होऊन आज आठ महिने पूर्ण होत आले आहे तरी देखील विद्यापीठ स्तरावरून पदभरती बाबत परीक्षा घेण्यात आलेल्या नाही.

 

4. माननीय मंत्री कृषी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 जून 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत वर्ग 4 पदांची ज्या पदांना लेखी परीक्षा नाही अशा पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करून गुणवत्ता यादी तयार करून नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय झाला होता.

5. तसेच उर्वरित गट क पदांची परीक्षा दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत व गड मधील उर्वरित पदांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचा निर्णय झाला होता 

6. विद्यापीठ स्तरावरून याबाबत अजूनही कुठल्याही प्रक्रिया केल्या गेल्या नाही. जाहिरात येऊन आठ महिने पूर्ण होऊन गेले असून भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सावट बघता लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 

7. दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत विद्यापीठ स्तरावरून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला गेला नाही. दि.18 ऑगस्ट 2025 पासून सर्व प्रकल्पग्रस्त उमेदवार विद्यापीठाच्या गेट समोर अन्नत्याग उपोषणास बसले आहेत.शासन स्तरावरून आदेशित केलेले असून देखील विद्यापीठ भरती प्रक्रियेस विलंब करत आहे, त्यामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीवपूर्वक सम्मती धारकानेच तक्रार अर्ज पूनर्वसन विभागत केल्यानेच या प्रकल्पग्रस्त पात्र उमेद्वारांना यामुळे होणारा त्रास वाढत असल्याने असंतोषाची भावना प्रकल्पग्रस्त उमेदवारांमध्ये होत आहे यामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवार हे अन्न त्याग उपोषणास बसले आहेत