कोथूर्णे गावात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज मावळ बंद ची हाक

प्रतिनिधी - मावळ मधील कोथूर्णे गावतील घडलेल्या घटनेमुळे मुलीचे आई वडिलच नाही तर मावळातील सर्व जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे .एका निष्पाप लहान मुलीला घराजवळून फसवून नेऊन तिच्यावर अमानुष पने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हसण्या खेळण्याच्या वयात मुलीची काहीच चूक नसताना अश्या वाईट कृत्याला सामोरे जाव लागतंय याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली या वाईट घटनेने सर्वजण हादरून गेले आहेत.एका निष्पाप निरागस मुलीला त्या नराधमाने हत्या करून संपवावे हे चीड निर्माण करणारे आणि सहनशीलतेच्या पलीकडे आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळाल्या शिवाय मावळ तालुक्यातील जनता शांत बसणार नाही.असा इशारा देत आज मावळ तालुका बंद ची हाक देण्यात आली आहे.