*नाबार्ड दिवस समारोह रामटेक येथील शाखेने साजरा करण्यात आला*

*नाबार्ड दिवस समारोह.*रामटेक येथील शाखेने साजरा केला*                                                                                                                                                                बी.पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क.                           रामटेक:-दिनांक 11, नगरधन: 42 वा नाबार्ड दिवस समारोहाचे यशस्वी आयोजन आज ग्राम नगरधन येथे, करण्यात आले. प्रस्तुत प्रसंगी, मा. श्री. अनिलकुमार श्रीवास्तव, साहेब महाप्रबंधक व मा. श्री.सचिन सोनोने साहेब , AGM नाबार्ड, DDM नागपूर उपस्थित होते. श्री. प्रशांत जी कामडी, सरपंच साहेब यांनी सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले. बँक सखी श्रीमती दमाहे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रस्तुत कार्यक्रम शहीद स्मारक नगरधन येथे आयोजित असल्याने, कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात घेता, सर्वप्रथम *शहीद चिंतामण गोविंद फरकाडे* यांच्या *स्मृती पट्टीकेवर*

माल्यार्पण करून आत्मीय अभिवादन करण्यात आले - श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रस्तुत प्रसंगी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. मा. श्री श्रीवास्तव साहेबांनी, प्रस्तुत प्रसंगी विचार व्यक्त करतांना, *आपल्या सर्वांगीण विकासाकरिता सिद्ध व्हा, आपली किंमत ओळखा व पुढे जा, हा संदेश दिला. आपल्या परिवाराची काळजी घ्या, आपले उत्पन्न वाढवा, त्यासाठी नवनवीन व्यावसायिक कल्पनांचा स्वीकार करा, असे आवाहन केले.* *मा.श्री सोनोने ह्यांनी नाबार्ड म्हणजे काय? व नाबार्ड चा सामान्य जीवनावर पडणारा प्रभाव या विषयावर सखोल चिंतन केले.* अध्यक्षीय भाषणातून *मा. श्री. कामडी यांनी, गावाच्या महिलांचे विकासासाठी कटिबद्ध असून जो जी मदत मागेल त्यास ती मदत पुरविण्याचे अभिवचन दिले.* *श्रीमती दीपिका शहारे शाखा प्रबंधक यांनी उत्कृष्ट ग्राहक सेवेचे अभिवचन दिले.* उपस्थित महिलांनी काही प्रश्न विचारले , त्यातील प्रमुख प्रश्न हा होता की, *आम्ही icici बँकेकडून कर्ज घेत आहोत, परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीत मात्र खूप त्रास होतो, आम्हांस आपल्या बँकेत कर्ज मिळू शकेल काय? यावर नियम व अटींच्या स्वाधीन राहून उत्कृष्ट सेवा प्रदान केली जाईल असे त्यांना उत्तर देण्यात आले,* ज्यावर उपस्थित महिलांनी *समाधान* व्यक्त केले येत्या काही दिवसांत उत्तम क्वालिटी असलेली चांगली कर्ज प्रकरणे प्रस्तुत गावांत मिळतील, याची खात्री आहे.