सावनेर येथील सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील यांचा स्थानीय परिसरात स्वच्छते बाबत पुढाकार.
1.
सावनेर येथील सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील यांचा स्थानीय परिसरात स्वच्छते बाबत पुढाकार.
सावनेर :आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो.
महणुन वेळोवेळी काही जागरूक नागरिक स्वच्छतेबाबत ठामपणे उभे असतात .
सावनेर शहरातील सटवामाता मंदिर परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विनीत पाटील यांनी वार्डातील झोपडपट्टी व परिसरात स्वनिधीतून कीट व जंतुनाशकेची फवारणी केली . भविष्यातील आजारांपासून येथील रहिवाशांचे जगणे सुखरूप व्हावे याकरिता विनीत पाटील नेहमी समाज कार्यात पुढे असतात . विनीत पाटील यांनी सावनेर नगर पालिकेतील अधिकाऱ्यांना वारंवार सदर त्रासाबद्दल तोंडी तक्रार देऊन सुध्धा कोणतेही कार्यवाही न केल्याने अखेर ना-ईलाजाने विनीत पाटील यांनी स्वतःही ह्या कार्याला आपल्या यंग बॉईज टीम सोबत सटवामाता मंदिर परिसर येथे स्वखर्चाने जंतू नाशक फवारणी केली व पुढे ही ते अशेच समाज कार्य करत राणार अशी त्यांनी गवाही दिली.
यावेळी विनीत पाटील सोबत ,प्रतीक लाटकर, अक्षय आवारी, प्रशांत उके ,पवन राऊत ,भूषण आवारी, राजकुमार गडकोंडले, विकी शेंडे, अनिल धुर्वे, राहुल नाहरकर ,अमर हजारे, सुनील मानकर, हर्षल दुधकवडे, आदेश चरपे, अक्षय बिलवार ,अभिषेक दास, आकश ढोके , मयूर शेंडे, मुकेश बन्सोड ,शुभम चोवधरी, वैभव खाटिकर, सोनू हजारे ,अनुज चांदेकर ,मोनू देरकर, अभिषेक साराटे , प्रणय लाटकर, यश गोतमरे, दीपक गोखले, बलराम हजारे, मयूर साराटे , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .