शेवगाव मध्ये तहसील कार्यालयातील लिपिका चोप
रस्त्याच्या कामासाठी खडीची वाहतूक करणाऱ्या कडून कारवाई टाळण्याच्या बहाण्याने कोणताही अधिकार नसताना अनाधिकृतपणे पैशाची मागणी करणाऱ्या शेवगाव तहसील कार्यालयातील एका लिपिकास डंपर चालक व संबंधितांकडून झोप देण्यात आला विशेष म्हणजे वरिष्ठांच्या कोणत्याही आदेशाशिवाय तालुक्याच्या हद्दीबाहेर जाऊन संबंधित लिपिकाने दाखवलेले हे धाडस त्याच्या भलतेच अंगलट आले. त्यास त्याच्या चार चाकीतून उचलून नेत बेदम मारहाण करण्यात आली.
पैठण रस्त्यावरील करे टाकळी शिवारात सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कामावर दि.21 रोजी सायंकाळी शेवगाव तहसील कार्यालयातील एक लिपिक स्वतःच्या विना क्रमांकाच्या चार चाकी वाहनातून वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना वेगळ्या हेतूने गेला. तेथे खडी वाहतूक करणाऱ्या डंपर चालक व संबंधित व्यक्तींना पदाची गुमीॅ दाखवत त्याच्याकडून कारवाई टाळण्यासाठी काही रकमेची मागणी केली. संबंधितांनी त्याच्या या मागणीचे रीतसर चित्रीकरण मोबाईल मध्ये केले त्यानंतर त्यास रस्त्यावरच चालक व संबंधितांनी चांगला चोप दिला . सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत असल्याचे पाहून शिवारातील एका फार्म हाऊस वर नेऊन तेथे देखील त्याची येथेच धुलाई करण्यात आली. या प्रकरणामुळे गोंधळून गेलेल्या त्या लिपिका ने आपली सोडवणूक करून वाहनासह शेवगाव कडे पलायन केले याबाबत दोघांनी तक्रार दाखल करण्याची टाळले असले तरी या प्रकरणाची माहिती काही वेळात शेवगाव मध्ये समजली त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत असलेल्या त्या लिपिकाची मान शर्मिने खाली गेली.
या प्रकाराबाबत तहसीलदार कार्यालयात जोरदार चर्चा सुरू होती याबाबत तहसीलदार छगन वाहक यांच्याशी संपर्क साधला असता घडलेल्या प्रकाराची माहिती आपण घेत असून त्याबाबत अधिकृत पणे काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व लिपिक हे अधिकाऱ्यापेक्षा पुढे एक पाऊल टाकण्यात पटाईत असल्याचे लासलुचपत विभागाच्या वेगवेगळ्या कारवाईमुळे व घटनांमुळे महसूल विभागाची नाचक्की होते. वरिष्ठांच्या आदेशाविना व कोणत्याही अधिकाराविना वसुलीसाठी फिरणाऱ्या काही ठराविक कर्मचाऱ्यांची लोकेशन तपास्यास ते अनेक प्रताप बाहेर येतील.