नव्याने नियुक्त झालेल्या शेवगाव तालुका पुरवठा विभागात श्रीमती. मंगल पवार यांचा कारभार अत्यंत पारदर्शक व सुसज्ज
नव्याने नियुक्त झालेल्या शेवगाव तालुका पुरवठा विभागात श्रीमती. मंगल पवार यांचा कारभार अत्यंत पारदर्शक,सुसज्ज,
प्रतिनिधी-यशवंत पाटेकर.
शेवगाव: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका तहसील मधील नव्याने नियुक्त झालेल्या श्रीमती. मंगल पवार मॅडम पुरवठा विभागातील यांच्या ऑफिसचे अतिशय सुसज्ज असे कामकाज व्यवस्थित चालले आहे. असे प्रतिपादन श्री.संजय राजे भोसले तहसील कार्यालय शेवगाव पुरवठा विभागाला सदिच्छा भेट दिली असता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच श्री. भोसले यांनी निवेदन पत्र जिल्हाधिकारी साहेब यांना देताना शेवगाव तालुक्यातील पुरवठा विभागांमध्ये कामकाज अतिशय सुव्यवस्थितपणे चालले आहे. व पुरवठा विभागाचा मागासलेला चेहरा मोहरा व त्यातील ताटकळत राहिलेली नागरिकांची कामे पुरवठा विभागातील नव्याने नियुक्त झालेल्या श्रीमती.पवार मॅडम यांनी तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना घेऊन तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून संयोजनशील व सहकार्याच्या भावनेतून वागत असल्याबाबत दिसून आले. पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी नागरिकांची गैरसोय होऊ देत नाहीत व सर्वांची कामे झालीच पाहिजेत. रेशनचे काम करत असताना.सर्व टापटीप पणे कामामध्ये स्वत पवार मॅडम जातीने लक्ष घालून असतात.श्रीमती पवार मॅडम पुरवठा अधिकारी शेवगाव येथे रुजू झाल्यापासून तालुक्यातील नागरिकांचे रेशन कार्ड ऑनलाइन, करणे नाव कमी करणे,इत्यादी रेशन नवीन रेशन काढणे इत्यादी कामे अतिशय सुलभ, तसेच अत्यंत स्वच्छ पारदर्शक कारभाराप्रमाणे काम करत आहेत. काटेकोर कारभार करणाऱ्या आहेत तरी त्यांची सेवा पुस्तके मध्ये नोंद घ्यावी असे आव्हान श्री संजय एस राजे भोसले यांनी मा.तहसीलदार-प्रशांत सांगडे साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांना केले आहे.