डिग्रस ग्रामपंचायत ग्रामसेवक डोंगरे साहेब डिग्रस गावातील अतिक्रमणचा डोगर कधी हटवणार डिग्रस ग्रामस्थांचा संतप्त सवाल.
अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरीच्या डिग्रस ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीतील राजवाडा परिसरातील समाज मंदिरात अनेक महिन्यापासून अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणास येथील सरपंच व ग्रामसेवकाचा वरदहस्त असल्याची चर्चा सद्ध्या सुरु आहे . शेजारीच रहिवाशी असलेले आमोल नाना पवार,व नाना तुकाराम पवार, यांनी समाज मंदिरावर
अतिक्रमण केले असल्याने ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराविषयी नाराजी असल्याचे दिसून येत आहे . फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्याचे काम ग्रामपंचायत करत असल्याचे निदर्शनास येत आहे . संबंधीत अतिक्रमण काढण्यासाठी येथील समस्त ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकांना वेळोवेळी तक्रार केली असूनही त्यावर सरपंच व ग्रामसेवकांनी हे अतिक्रमण काढणे साठी अतिक्रमण धारकास दि.२९/०४/२०२४ रोजी प्रथम नोटीस दिली . त्यानंतर २ री नोटीस दि.१७/०५/२०२४ रोजी तसेच ३री नोटीस दि.०७/०६/२० २४ रोजी दिली आहे .
या तिन्ही नोटिसा ग्रामसेवक व सरपंचांनी टपालाद्वारे पाठवून दिल्याने अतिक्रमण धारक कुटूंब ग्रामपंचायतीस न जुमानता बिनधास्तपणे सर्व सुविधांचा फायदा घेऊन तेथे राहत आहे .सदरची व्यक्ती अतिक्रमण सोडत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतीने या नोटीसांच्या प्रती गटविकास अधिकारी राहुरी यांना हि पाठवल्या आहेत .
दलितवस्तीतील समाज मंदीर इमारत बांधले पासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीने काम ग्रामसेवक सरपंचाने केले नाही डिग्रस ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामविकास दर्जाचा अधिकारी न देता राहुरीच्या पंचायत समितीचे बिडिओ यांनी जानिवपूर्वक ग्रामसेवकाकडे प्रभारी चार्ज दिला आहे या ग्रामसेवकाचे लक्ष गावातील जन सुविधांकडे नसून भलतीकडेच आहे आशी स्थानिक ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे
समाज मंदीराच्या इमारतीचा स्लॅब वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने कोसाळण्याच्या मार्गात आहे .समाज मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात तन वाढले असून काटेरी बाभळींचाही प्रादुर्भाव वाढला आहे . समाज मंदिरातील अतिक्रमण काढून त्याची तात्काळ दुरुस्ती करून परिसरातील जागा स्वच्छ करावी व ज्या हेतूने समाज मंदिराचे बांधकाम झाले आहे त्याच उद्देशासाठी त्याचा वापर व्हावा अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे .ग्रामपंचायत ने या घटनेची तात्काळ दखल घेऊन कागदी घोडे न नाचवता तसेच अतिक्रणम झालेले रस्ते व ओढे या सहअतिक्रमण धारकाच्या ताब्यातून समाज मंदिर मुक्त करून त्याचे देखभाल दुरुस्तीचे काम करावे अन्यथा नागरिकांच्या रोशास सामोरे जाण्याची तयारी ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी ठेवावी असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे .