टाकळीमिया परिसरात भीषण घटना रेल्वे अपघातात अनिता लाहुंडे यांचा जागीच मृत्यू*

टाकळीमिया परिसरात भीषण घटना रेल्वे अपघातात अनिता लाहुंडे यांचा जागीच मृत्यू*
टाकळीमिया परिसरात भीषण घटना रेल्वे अपघातात अनिता लाहुंडे यांचा जागीच मृत्यू*

*टाकळीमिया परिसरात भीषण घटना रेल्वे अपघातात अनिता लाहुंडे यांचा जागीच मृत्यू*

राहुरी तालुक्यातील टाकळी गावातून शेतमजुरी करण्यासाठी मुसळवाडी येथे जात असताना घडलेल्या दुःखद अपघातात अनिता लक्ष्मण लाहुंडे वय ४८ यांचा मृत्यू झाला आहे.

टाकळीमिया गावातील अनिता लाहुंडे या दररोज च्या दिनचर्ये नुसार शेतमजुरी करण्यासाठी मुसळवाडी येथे उशीर झाल्यामुळे घाई घाई जात होत्या 

 रेल्वेमार्ग ओलांडत असताना दौंडकडून मनमाडकडे जाणाऱ्या मालवाहतूक गाडीची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.ही घडल्यानंतर स्थानिकांनी त्यांचा मुलगा सौरभ लाहुंडे आणि त्यांचा भाऊ बापूसाहेब शेंडगे यांना घटनेची माहिती दिली 

अनिता लाहुंडे यांना कानाने ऐकू कमी येत असल्यामुळे मालगाडी येत असल्याच त्यांना समजले नाही, अशी माहिती मिळते. घटनास्थळी उपस्थितांनी तत्काळ मदतकार्य करून सचिन धसाळ यांच्या रुग्णवाहिकेला तात्काळ बोलवून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणला तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी अनिता यांना मृत घोषित करून मृतदेह शवविच्छेदना साठी पाठवण्यात आला 

मागील पंधरा वर्षांपूर्वी अनिता यांच्या पतीचे निधन झाले होते. तेव्हापासून अनिता लाहुंडे या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत होत्या. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली आणि दोन मुलं असा परिवार आहे.

या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे टाकळीमिया परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राहुरी तालुका प्रतिनिधी  -

डॉ देवेंद्र शिंदे