पाथर्डी तालुक्यातील निवडूंगे गावात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बट्ट्याबोळ

पाथर्डी तालुक्यातील निवडूंगे गावात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बट्ट्याबोळ

पाथर्डी तालुक्यातील निवडूंगे गावातील हुशाई वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला गेल्या साडेतीन वर्षापासून शिक्षक नाही. पहिली ते चौथी या वर्गासाठी एकच शिक्षक कार्यरत आहे.

शिक्षण विभागाला सोमीनाथ तुकाराम शिरसाट यांनी वारंवार अर्ज देऊनही या अर्जाची काही दखल घेतली गेली नाही. शिक्षण विभागाचा हा चालणारा भोंगळा कारभार हा मुलांच्या भविष्य करता घातक ठरणार आहे. उद्याचे घडणारे हे भविष्य शिक्षणापासून वंचित राहणार आहे.

या जिल्हा परिषद हुशाई वस्तीवरील मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेला गट शिक्षण अधिकारी शिक्षक देणार आहेत की नाही असा प्रश्न यावेळी पालकांमध्ये उभा राहतोय. विद्यार्थ्यांच्या पालकांनमध्ये आपल्या मुलाच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांच्या होणाऱ्या नुकसानीला गट शिक्षणाधिकारी जबाबदार असणार आहे.

लवकरात लवकर या शाळेला जर शिक्षक मिळाला नाही तर सर्व पालक मिळून या शाळेला कुलूप लावून शाळा बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.