शाळेने केलेल्या संस्काराची परतफेड चांगल्या गुणांनी करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.तहसिदार-प्रंशात सांगडे
शाळेने केलेल्या संस्कारांची परतफेड चांगल्या गुणांनी करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे-प्रशांत सांगडे
प्रतिनिधी , भारत भालेराव
शेवगाव : दि-१६ आपल्या शाळेने केलेल्या शिक्षणरूपी संस्काराची परतफेड आपण परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या स्वरूपात होत असते आणि यासाठी आपण भयमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा आणि ठरवलेलं ध्येय गाठेपर्यंत स्वस्थ बसू नका आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन शेवगावचे तहसीलदार श्री.प्रशांत सांगडे साहेब यांनी ढोरजळगाव येथे बोलताना केले.
श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे फेब्रु/मार्च 2024 मध्ये होणाऱ्या इ 12 वी आणि इ 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला गेला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमासाठी नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेल्या निकालात उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले अविनाश लोढे यांनी आपल्या मनोगतात जीवनात यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केल्यास यश हमखास मिळते समाजात जीवन जगत असताना चुकीच्या अफवाना बळी पडू नका आयुष्यात थोरा-मोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. घरात आपल्या पालकांशी संवाद ठेवा आणि मुलींनी देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करा असे मत मांडले यावेळी विद्यालयाच्या वतीने अविनाश लोढे साहेबांचा उप जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यात दृष्टिकोन चांगला ठेवा आयुष्यात गरुडासारखी झेप घ्या कारण कुठलीच परीक्षा आयुष्याची शेवटची परीक्षा नसते अश्या अनेक परीक्षांना तुम्हाला सामोरे जायचे आहे असे मत मांडले. या प्रसंगी श्रेया फसले, हर्षदा वाकडे, भाग्यश्री बडे,वीर शितल या विद्यार्थ्यींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे , हंसराज पाटेकर, संभाजी लांडे, दिपक खोसे,भाऊसाहेब टाकळकर, सुधाकर आल्हाट, ईश्वर वाबळे, अमोल भालसिंग, कल्याण राऊत, श्रीमती पूनम वाबळे, वरिष्ठ लिपिक महेश शेळके यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.प्रगती कराड व सोलाट विद्या हिने केले तर शर्वरी अकोलकर हिने उपस्थितांचे आभार मानले.