मतदान केंद्रात व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल केले . शेवगाव तालुक्यात रांजणी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

मतदान केंद्रात व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल केले . शेवगाव तालुक्यात रांजणी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

शेवगाव. मतदान केंद्रात मतदान करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केल्याप्रकरणी 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील रांजणी ता. शेवगाव येथील भरत औटी यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात दहिगाव ने सेक्टर चे झोनल अधिकारी सारंग दुगम यांनी फिर्याद दखल केली आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मौजे रांजणी येथील मतदान केंद्रावर भरत आवटी या इसमाने बुधवार दिनांक 20 रोजी सकाळी मतदान करताना व्हिडिओ बनवून तो गावच राजकारण या व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल केला.

यासंदर्भात नारायण घुले यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार प्रशांत सागडे यांनी दहिगावने चे झोनल अधिकारी सारंग दुगम यांच्याशी संपर्क साधून याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दुगम यांनी रांजणी येथे जाऊन मतदान केंद्राध्यक्ष रवींद्र जमादार यांच्याशी चर्चा केली. तसेच घडलेल्या बाबीची खातरजमा केली असता तक्रारदाराच्या तक्रारी तथ्य असल्याचे आढळून आल्याने भारत औटीविरुद्ध जिल्हा दंडाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशान्वये आचारसंहिता भंग व कायदेशीर आदेशाची अवज्ञा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.