शासकीय अधिकाऱ्याला “माजी मंत्री थोरातांच्या नातेवाईकांकडून मारहाण”?
शासकीय अधिकाऱ्याला “माजी मंत्री थोरातांच्या नातेवाईकांकडून मारहाण”?
अहिल्यानगर प्रतिनिधी : प्रसाद घोगरे : 93703289444
सविस्तर बातमी: संगमनेर पंचायत समिती कार्यालयात आज घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका शासकीय अधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सख्खे चुलत भाऊ शरद नाना थोरात, तसेच त्यांचा मुलगा आणि पुतण्या यांनी संबंधित अधिकाऱ्याशी वाद घालून त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार थोरातांच्या नातेवाईकांकडून हल्ला झाला” असा दावा केला आहे.
मात्र, ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मंत्री बाळासाहेब थोरात यांचा या घटनेत थेट सहभाग आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी काही स्तरांवर त्यांच्यावरही आरोप करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
या घटनेनंतर पंचायत समिती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.








