शिर्डीत हिंदूभाविकांवर जिहाद्यांकडून बेदम मारहाण; बजरंग दलाचा संस्थान व प्रशासनाला कडक इशारा
शिर्डीत हिंदूभाविकांवर जिहाद्यांकडून बेदम मारहाण; बजरंग दलाचा संस्थान व प्रशासनाला कडक इशारा
प्रतिनिधी : प्रसाद घोगरे - 9370328944.
जगप्रसिद्ध साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्तावर जिहादी पेरू विक्रेत्यांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सदर घटना साई मंदिर परिसरातील गेट क्रमांक २ जवळ घडली असून, या प्रकरणामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उत्तराखंड येथील रहिवासी राजेंद्रसिंग रावत हे मंगळवारी मंदिर परिसरातून जात असताना चुकून त्यांच्या पायाचा स्पर्श एका पेरू विक्रेत्या महिलेच्या टोपलीला झाला. याबाबत त्यांनी तत्काळ माफी मागितली. मात्र, किरकोळ कारणावरून वाद वाढत गेला आणि संबंधित जिहादी विक्रेत्यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
या घटनेत दोन महिला व एका युवकाने रावत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यापैकी एका महिलेने लाकडी फळीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात रावत गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला तब्बल ८ टाके घालावे लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुस्कान शेख, फरीद शेख आणि सोहेल शेख (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर शिर्डी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली असून अनेक टपऱ्या व सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसरात साई संस्थानचे सुरक्षा रक्षक, पोलीस व एमएसएफचे जवान तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.








