*अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरणाचा कुत्र्यांनी लचके तोडल्याने मृत्यू *
सावनेर व न विभाग
अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरणाचा कुत्र्यांनी लचके तोडल्याने मृत्यू Delhi 91 BPS Live News network. सावनेर : -सकाळी हेल्थ युनिट येथे मृत अवस्थेत हरिण पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली . प्रत्यक्ष पाहणी दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, या हरणाच्या पायाला वाहनाची धडक लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर अवस्थेमध्ये हरिण हे हेल्थ युनिट मध्ये शिरले
असावे आणि गंभीर अवस्थेमध्ये असल्यामुळे कुत्र्याने त्याचे लचके तोडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला . असा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती सावनेरचे ठाणेदार रवींद्र मानकर यांना देण्यात आली आहे . त्यांनी लगेच खापा फॉरेस्ट ऑफिस मध्ये संपर्क करून घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली . काही वेळातच वन विभागाची टीम येऊन मृत असलेल्या हरणाचा पंचनामा करून घेऊन गेले आहे . आजूबाजूच्या परिसरात वनक्षेत्र असल्याने वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे, कदाचित हे प्राणी पाण्याच्या शोधात आले असावे,हा अपघात रात्री एक ते दोन च्या सुमारास घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे .