*2022 अंतर्गत कृषी तंत्रज्ञान महिला समीकरण दिवस साजरा करण्यात आला*

कृषी

*2022 अंतर्गत कृषी तंत्रज्ञान महिला सक्षमीकरण दिवस साजरा करण्यात आला*                                                           *बी.पी .एस. राष्ट्रीय लाईव्ह न्युज नेटवर्क                                             * पारशिवनी:-आज दिनांक 27 जून रोजी तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी. गच्‍चे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा साटक येथे कृषी संजीवनी सप्ताह 2022 अंतर्गत कृषी तंत्रज्ञान महिला सक्षमीकरण दिवस साजरा करण्यात आला . यावेळी कृषी तसेच इतर क्षेत्रातील महिलांचे योगदान तसेच महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतित तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी गच्चे मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केले. महिला घरापर्यंत आणि मजुरी पर्यंत सीमित न राहता उदयोजक बनून पुढे येणे काळाची गरज आहे. असे सांगितले. सोबतच महिला सक्षमीकरणसाठी कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांना सक्षम करण्याबाबत योजनांची माहिती उपस्थित महिला शेतकऱ्यांना दिली यावेळी गावच्या प्रथम नागरिक सौ सीमाताई उकुंडे सरपंच साटक ग्रामपंचायत यांनी अध्यक्षीय भाषण करून महिलांना मार्गदर्शन केले ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री के बी ठोंबरे कृषी सहाय्यक साटक यांनी केले तसेच कृषी पर्यवेक्षक श्री पी.डी शिरपूरकर यांनी महिला सक्षमीकरण दिवस बाबत माहिती दिली 

 

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी डॉ ए.टी गच्चे मॅडम ,ग्रामपंचायत सरपंच सौ सिमाताई उकुंडे , मंडळ कृषी अधिकारी कन्हान श्री जी बी वाघ ,कृषी पर्यवेक्षक श्री पी डी शिरपूरकर ,श्री एस पी कुबडे ,कृषी सहाय्यक साटक श्री के बी ठोंबरे ,श्री एस.एच साठे तसेच गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या